Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'

Sangram And Khushboo | छोट्या पडद्यावर काम करून प्रचंड प्रसिद्धी मिळवणारे कलाकार क्वचितच पाहायला मिळतात. असेच दोन कलाकार म्हणजे अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे. हे दोन कपल सध्या त्यांचं वैयक्तिक आयुष्य अतिशय आनंदात आणि सुखात चाललं आहे. परंतु हे दोघं एकमेकांना कसे भेटले, दोघांचं एकमेकांवर प्रेम कसं जडलं याबद्दल त्यांच्या चाहत्यांना ठाऊकच नाही आहे. संग्रामने खुशबुला एका वेगळ्या अंदाजात प्रपोज करून आपलंसं करून घेतलं होतं.
अशी सुरू झाली संग्राम आणि खुशबुची लवस्टोरी :
बऱ्याच दिवसांआधी देवयानी नावाची मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर लागायची. देवयानी सिरीयलच्या सेटवर संग्राम आणि खुशबुची भेट झाली. सेटवर असल्यामुळे दोघेही एकमेकांना ओळखू लागले होते. परंतु खुशबुला असं वाटायचं की संग्राममध्ये प्रचंड एटीट्यूड आहे. त्यामुळे ती स्वतःहून बोलायला घाबरायची. संग्राम मात्र खुशबूवर फिदा होता.
त्याने एका मेकअप आर्टिस्टकडून तिचा नंबर घेतला आणि तिला कॅफेमध्ये भेटायला बोलावले. तिथे त्याने अतिशय हटके अंदाजात खुशबुला प्रपोज केला. तो म्हणाला, तुला माझ्याबरोबर म्हातार व्हायला आवडेल का. अशा युनिक स्टाईलने प्रपोज केल्यामुळे खुशबूने अतिशय खुश होऊन संग्रामला होकार दिला.
सध्या दोघही अतिशय आनंदात असून नुकताच दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. याआधी त्यांना एक मुलगा झाला होता. आता चौघजण अतिशय आनंदात आपले जीवन घालवत आहेत. देवयानीच्या सेटवर प्रपोज करण्याआधीच खुशबुला मालिका सोडावी लागली होती. त्यामुळे संग्रामने चांगली शक्कल लढवत आणि स्वतःच्या रांगड्या अंदाजात खुशबुला इम्प्रेस करून आपल्याच करून घेतलं. या दोघांचा शुभविवाह 2018 रोजी 5 मार्चला झाला आहे. अशा प्रकारची संग्रहांची हटके लव्ह स्टोरी आतापर्यंत खूप कमी लोकांनाच माहीत होती.
View this post on Instagram
Latest Marathi News | Sangram And Khushboo 25 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं