खासदार संजय राऊत आणखी तीन चित्रपटांची घोषणा करणार

मुंबई : भारतीय राजकारणाच्या इतिहासात ठसा उमटवणार नाव म्हणजे हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या जीवनावरील ठाकरे या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर संजय राऊत आता पुन्हा चित्रपट सृष्टीत पॉल टाकणार आहेत. राजकारणी ते चित्रपट निर्माते असा प्रवास करणारे संसद सदस्य संजय राऊत आपल्या आगामी तीन चित्रपट प्रकल्पाची घोषणा करण्यास सज्ज झाले आहेत. ठाकरे हा चित्रपट राऊटर्स एंटरटेनमेंटचे संजय राऊत लिखित, संकल्पित आणि निर्मित पहिला चित्रपट आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने भरघोस यश मिळवले. आता त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातील जगासमोर न आलेल्या गोष्टींवर ठाकरे चित्रपटाचा सिक्वेल येत्या काळात लोकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी संजय राऊत संपूर्ण नवीन टीम घेणार असल्याच कळतंय. तसेच संजय राऊत याना त्यांचा दुसरा प्रकल्प माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आयुष्यावर करायचा आहे. जॉर्ज फर्नांडिस यांचे कार्य त्यांचा लढा त्यांचे आयुष्य हे तरुणाईला नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल.
सध्या तरी या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी कोणाला घ्यायचे यासाठी शोधमोहीम चालू आहे. तसेच त्यांचा तिसरा प्रकल्प हा २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याबद्दल लोकांना माहित नसलेल्या गोष्टींवर येणार आहे. २६/११ च्या हल्ल्यात काही गोष्टी अश्या घडल्या ज्या अजूनही सामान्य जनतेपर्यंत पोचलेल्या नाहीत. चित्रपटाद्वारे या गोष्टी त्यांना जगासमोर आणायच्या आहेत. विशिष्ट प्रकारे आखणी करत असलेले हे चित्रपट नक्कीच लोकांना आवडतील. निर्माते संजय राऊत लवकरच औपचारिक पद्धतीने सुद्धा या प्रकल्पांची घोषणा करणार आहेत. हे चित्रपट सुद्धा संजय राऊत याना यश मिळवून देणारे ठरतील का हे आता पाहायचे आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं