ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते कादर खान यांचे निधन

टोरोंटो : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि लेखक कादर खान यांचे काल ३१ डिसेंबरला प्रदीर्घ आजाराने आणि वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले आहे. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे. सरफराज याने प्रसार माध्यमांना कळविले की, माझ्या वडिलांनी काल ३१ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता ( कॅनडाच्या प्रमाणवेळेनुसार) अंतिम श्वास घेतला. त्याआधी दुपारी ते कोमात गेले होते आणि अखेर संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मागील १६ ते १७ आठवड्यांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. त्यानिमित्त त्यांचे संपूर्ण कुटुंब कॅनडात त्यांच्या सोबत होते. त्यामुळेच त्यांच्या पार्थिवावर अखेर कॅनडातचं अंत्यसंस्कार होतील असं वृत्त आहे.
कादर खान हे अनेक दिवसांपासून प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लीयर पाल्सी या आजाराने ग्रस्त होते. यामुळे त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. २२ ऑक्टोबर १९३७ रोजी जन्मलेल्या कादर खान यांनी १९७३ मध्ये ‘दाग’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केली होता. त्यात राजेश खन्ना यांना मुख्य भूमिकेची संधी मिळाली होती. यापूर्वी रणधीर कपूर आणि जया बच्चन यांच्या ‘जवानी दिवानी’ या चित्रपटासाठी कादर खान यांनी संवाद लेखन केले होते. मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत त्यांनी अनेक पटकथा लिहिल्या. बॉलीवूड’मध्ये ते व्हिलन आणि कॉमेडी कलाकार म्हणून प्रसिद्ध होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं