Shehnaz Gill | शहनाज गिलची क्रेझ पाकिस्तानमध्ये सुद्धा, पाकिस्तानी अभिनेत्री यश्मा गिलनच्या टिप्पणीने हा व्हिडीओ व्हायरल

Shehnaz Gill | बीग बॉस फेम शहनाज गिल दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चालली आहे. फोटो, व्हिडिओ आणि चित्रपटांमधून अभिनेत्री चाहत्यांच्या मनामध्ये घर करत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चाहते शहनाजला भरभरून प्रतिसाद देत असतात. पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणाऱ्या शहनाजचा विदेशामध्ये सुद्धा डंका वाजतो. शेजारील देश पाकिस्तानमध्ये सुद्धा शहनाजचे चाहते झाले आहेत.
शहनाजच्या निरागस स्टाईलवर पाकिस्तानी अभिनेत्री फिदा
15 ऑगस्ट रोजीचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये, ती सलूनच्या बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना म्हणते की, ‘तुमच्या मुळे माझे 1000 रुपये गेले कारण मला केस स्ट्रेटनिंग करावे लागले’. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओची पाकिस्तानमध्ये सुद्धा क्रेझ आहे. दरम्यान, पाकिस्तानी अभिनेत्री यश्मा गिलनेही तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे.
पाकिस्तानी वेबसाइटवर शहनाजसाठी प्रेमाचा वर्षाव
पाकिस्तानी अभिनेत्री यश्मा गिलनच्या टिप्पणीने हा व्हिडीओ पाकिस्तानमध्येही व्हायरल झाला, तिथल्या लोकांनी व्हिडीओला कमंट देत शहनाजवर प्रेमाचा वर्षाव सुद्धा केला. पाकिस्तानी अभिनेत्रीच्या कमेंटमुळे हा विषय न्यूज वेबसाइटवर सुद्धा झळकला.
शहनाज झळकणार भाईजान सोबत
आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये शहनाज गिल बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सोबत झळकणार आहे. दरम्यान, याचित्रपटामध्ये सलमान खान, पुजा हेगडे, शहनाज गिल, आयुष शर्मा दिसून येणार आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shahnaz Gill craze in Pakistan Checks details 7 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं