Shakti Kapoor | करियर संपल्यात जमा होतं, घरी निघायची तयारी केलेली, कसं बदललं नशीब? शक्ती कपूरचा रंजक किस्सा

Shakti Kapoor | तुम्ही आत्तापर्यंत अनेक कलाकारांचे सेटवरील शूटिंग दरम्यानचे किस्से नक्की ऐकले असतील. परंतु आज आम्ही तुम्हाला 1983 च्या जमान्यामधील एका खलनायकाच्या करिअरबद्दल माहिती सांगणार आहोत. हा किस्सा खलनायक आणि कॉमेडियन अभिनेता ‘शक्ती कपूर’ यांचा आहे. 1983 साली के बाजपेई दिग्दर्शित ‘मवाली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
आपलं करियर पूर्णपणे संपतंय की काय अशी भीती…
या चित्रपटांमध्ये मेन हीरो हीरोइनचे काम अभिनेता जितेंद्र आणि अभिनेत्री श्रीदेवी यांनी केलं होतं. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये शक्ती कपूर देखील झळकले. दरम्यान शक्ती कपूर यांना मवाली या चित्रपटानंतर आपलं करियर पूर्णपणे संपतंय की काय अशी भीती मनामध्ये आली होती. नेमकं काय आहे या मागचं कारण चला पाहूया.
जीवनातील ही गोष्ट तुम्हाला आत्तापर्यंत कोणीही सांगितले नसेल
शक्ती कपूर यांच्या जीवनातील ही गोष्ट तुम्हाला आत्तापर्यंत कोणीही सांगितले नसेल. अभिनेता शक्ती कपूर यांनी आत्तापर्यंत त्यांच्या कॉमेडीमधून प्रेक्षकांना खदखदून हसवलं आहे. सोबतच खलनायकाच्या भूमिका देखील त्यांनी पार पाडल्या आहेत. त्यांच्या खुसखुशीत कॉमेडीचा आणि खोलनायक भूमिकेचा दबदबा टिकवून ठेवला होता. परंतु मवाली या चित्रपटामुळे त्यांचं रुपेरी पडद्यावरचं करियर जमतंय की काय? अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
‘द ग्रेट कपिल शर्मा शो’ मध्ये शक्ती कपूर यांनी हजेरी लावली
‘द ग्रेट कपिल शर्मा शो’ मध्ये शक्ती कपूर यांनी हजेरी लावली होती. दरम्यान त्यांनी मवाली चित्रपटाबद्दल सांगताना म्हटलं की, “माझा सर्वात पहिला कॉमेडियन चित्रपट ‘सत्ते पे सत्ता’ हा होता. हा चित्रपट अतिशय चांगला होता. राज सीप्पी यांनी कॉमेडी रोल करणार का? असा प्रश्न मला विचारला. तेव्हा मी म्हटलं की, माझा विलनचा चांगला धंदा सुरू आहे तर कशाला उगाच मला कॉमेडियन बनवताय?”.
पुढे ते म्हणाले की,” सत्ते पे सत्ता या चित्रपटानंतर माझी मवाली फिल्म आली. पहिल्याच शॉटमध्ये अभिनेता कादर खान मला झापड मारतात. दुसऱ्या शॉटमध्ये अरुणा ईरानी मला झापड मारतात आणि मी खाली पडतो. त्यानंतर जितेंद्र साहेब मला लाथ मारतात आणि मी पुन्हा खाली पडतो. मला वाटलं की, आता माझं करियर इथेच थांबलं”.
पुढे शक्ती कपूर सांगतात की,” मी कादर खान यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं मला मवाली ही फिल्म करायची नाहीये. मला तुम्ही रात्रीचं तिकीट बुक करून द्या. नाहीतर माझं करियर संपून जाईल. तेव्हा फास्टर मास्टर विरु देवगन साहेबांनी मला सांगितले की, तू झापड खा, लाथा खा, लाज लज्ज सोडून कितीही मार खा आणि नंतर बघ चित्रपट किती हिट होईल आणि अगदी तसंच झालं”. मवाली या चित्रपटामुळे शक्ती कपूर यांचा नशीबच पलटलं.
News Title : Shakti Kapoor Revels revealed his experience in Bollywood career 02 September 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं