मालिकेचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे आणि पुढे काय दाखवायचे आणि काय नाही ते ?

पुणे : स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचे हाल दाखवू नयेत, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. तसंच आपली मागणी मान्य केल्याचा दावाही खोतकर यांनी केला त्यावर राष्ट्रवादीचे खासदार आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. असं कोणतंही आश्वासन मी दिलेले नाही. शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.
याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, स्वराज्यरक्षक संभाजी मालिका गेली अडीच वर्षे सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल, मालिकेत बदल केल्याबाबत जे वृत्त छापलं ते धादांत खोटं आहे. आवश्यक खबरदारी घेऊन मालिकेचे चित्रीकरण केले आहे. कोणताही भाग वगळावा अन्यथा नाही तो अधिकार निर्मात्याचा नाही तर झी मराठी वाहिनीचा आहे असं स्पष्टीकरण डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.
दरम्यान, स्वराज्यरक्षक संभाजी मालिका आता अखेरच्या टप्प्यात आहे. मालिकेत संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केल्याचे दाखवण्यात येत आहे. त्यानंतरची दृश्यं पाहमे मनाला पटणारं नाही, या मालिकेतील असे चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं खोतकरांनी सांगितलं होतं. दरम्यान, संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ करून त्यांना यातना देण्यात आल्या त्या पाहणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकण्याची भीतीही अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली होती.
Web Title: Story NCP MP and Actor Amol Kolhe statement on Swarajya Rakshak Sambhaji serial episode.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं