Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा

Surabhi Jyoti Wedding | ‘नागिन’ फेम अभिनेत्री आणि टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती लग्नबंधनात अडकली आहे. तिने काल 27 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली. यादरम्यानचे सुबक असे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
टेलिव्हिजन स्टार सुरभी हिने डेस्टिनेशन वेडिंगसाठी एक सुंदर अशी जागा निवडली आहे. दोघांचे हळदीचे त्याचबरोबर सात फेरे घेऊन लग्न बंधनात अडकतानाचे अनेक फोटोज वायरल झाले आहेत. सुरभीच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव देखील केला आहे.
सुरभीने लिहिलं असं कॅप्शन :
सुरभी ज्योतीच्या नवऱ्याचं नाव सुमित असं असून, दोघांनी निसर्गाच्या सानिध्यात एकमेकांना आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलं आहे. लग्नसोहळ्यात सुरभीने लाल रंगाचा सुंदर असा घागरा परिधान केला असून सुमितने पांढऱ्या रंगाची लांब शेरवानी परिधान केली आहे. आपल्या पतीबरोबरचे फोटोज शेअर करत सुरभीने लिहिलं आहे की, “शुभविवाह 27/10/2024”. असं साध स्वतःच्या लग्नाच्या तारखेचं कॅप्शन मेन्शन केलं आहे.
दोघांच्या सर्व फोटोजला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अरे एकच सेलिब्रेटी त्याचबरोबर मालिकेतील कलाकारांनी आणि सहकार्यांनी देखील दोघांच्या लग्नासाठी गोड शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
उत्तराखंडमध्ये केलं लग्न :
सुरभीने डेस्टिनेशन वेडिंगसाठी उत्तराखंडमधील एक सुंदर जागा निवडली होती. तिने उत्तराखंडमधील ‘जिम कॉर्बेट नॅशनल पार्क’ ही सुंदर अशी जागा खास लग्नासाठी निवडली होती. या पार्कमधील आहना आलिशान रिसॉर्टमध्ये दोघांचा विवाह सोहळा दणक्यात पार पडला.
हळदीमध्ये देखील केली भरपूर मज्जा :
सुरभीने तिच्या हळदी दरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले. यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा घागरा परिधान केला होता. या सुंदर आणि स्टायलिश घागऱ्यात सुरभी अतिशय खुलून दिसत होती. सध्या तिच्या लग्नाचे व्हिडिओ वायरल होत असून सुरभीच्या सिम्पल आणि गॉर्जेस ब्रायडल लुकची तुफान चर्चा होताना दिसत आहे.
Latest Marathi News | Surbhi Jyoti Wedding 29 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं