Adipurush | 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर 3 ऑक्टोबरला होणार रिलीज, प्रभास दिसणार 'प्रभु श्री राम' यांच्या भूमिकेत

Adipurush | प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरुष चित्रपटाविषयी दररोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. आदिपुरुषची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे आता या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटही समोर आली आहे. दरम्यान, पॅन इंडियाचा स्टार प्रभास कडे खुप मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत आणि ज्याची चाहते वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास ‘भगवान श्री राम’च्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत प्रबासचे पोस्टर सुद्धा समोर आले होते.
‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर 3 ऑक्टोबरला होणार रिलीज
‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. दरम्यान, चित्रपटाबाबतची उत्सुकता हळू हळू वाढायला लागली आहे. या चित्रपटाचा टीझर 3 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. तसेच हा टीझर दसऱ्याचे 2 दिवस आधी रिलीज होणार आहे. गमतीशीर गोष्ट म्हणजे, यावेळी दसऱ्याला प्रभास दिल्लीमध्ये असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीतील लवकुश रामलीला समिती लाल किल्ल्याच्या हिरवळीत अयोध्येतील राममंदिराची थीम असलेला पंडाल बनवण्यात येणार आहे. प्रभास यावर्षी 5 ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये VFX शॉट्स दिसून येणार
या चित्रपटामध्ये असे काही घडून येणार आहे जे या आधी भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये कधीही घडले नाही. ‘आदिपुरुष’चे शूटिंग खूप आधी संपले आहे. हा चित्रपट 3D असून यावर VFX चे काम सुरु होते. माध्यमांनुसार असे म्हटले जात आहे की, ‘आदिपुरुष’ चित्रपटामध्ये 8000 पेक्षा जास्त VFX शॉट्स असतील, जे कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी पहिले आहे.
संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’
दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये साऊथचा सुपरस्टार प्रभास दिसून येणार आहे. तसेच सैफ अली खान ‘लंकापती राजा रावण’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये क्रिती सेनन पहिल्यांदाच पौराणिक पात्र साकारताना दिसून येणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Teaser of the movie Adipurush will be released on 3rd October Checks details 14 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं