Tejaswini Pandit | तेजस्विनी पंडितच्या 'येक नंबर' ची जोरदार चर्चा, पोस्टरमधील ती करारी नजर वेधते अनेकांचे लक्ष - Marathi News
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Tejaswini Pandit
- दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपट येणार भेटीला
- तेजस्विनी पंडितच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या कौतुकाच्या कमेंट :
- चित्रपटाची रिलीज डेट :

Tejaswini Pandit | मराठमोळी अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ आणि वरदा साजिद नाडियाडवाला निर्मित लवकरच येणारा बहुचर्चित आगामी चित्रपट ‘येक नंबर’ ची सगळीकडे जोरदार चर्चा होताना पाहायला मिळतेय. आज 25 सप्टेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होणार असून, ‘ताज लँड एंड’ मध्ये अनेक दिग्गज राजकारणी आणि नावाजलेल्या कलाकारांसह तसेच दिग्दर्शकांसह हा लॉन्चिंग सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर कधी एकदा प्रदर्शित होतोय असं प्रेक्षकांना वाटत आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपट येणार भेटीला
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर येक नंबर या चित्रपटाचा टिजर पोस्ट केला आहे. टीजरच्या सुरुवातीलाच आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांचा ओरिजनल आवाज ऐकायला मिळतोय.’जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’. असं म्हणत टीजर लॉन्च केला गेला आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा नायक ‘धैर्य घोलप’ हा एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टर वरील अभिनेत्याचा फोटो पाहूनच समजतय की, या चित्रपटामध्ये चांगलेच राडे आणि कल्ले पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
तेजस्विनी पंडितच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या कौतुकाच्या कमेंट :
अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती तेजस्विनी पंडित हिने येक नंबर चित्रपटाचे अनेक व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या पोस्टला अनेकांनी सुंदर कमेंट केल्या आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरिल त्या एका कराऱ्या नजरेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही नजर महाराष्ट्राच्या ओळखीची असून, अनेक युजर्सने एका पेक्षा एक कमेंट केल्या आहेत. ‘डोळ्यातच दरारा आहे साहेबांच्या’.’हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट, राज साहेब ठाकरे’.’डोळ्यात दरारा’.’प्रचंड शुभेच्छा’ अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.
चित्रपटाची रिलीज डेट :
या आगामी आणि बहुचर्चित असलेल्या चित्रपटाची रिलीज डेट 10 ऑक्टोंबर असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपट सर्वांच्या भेटीस येणार आहे. तेजस्विनीने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये मेन्शन केलंय की,’झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित, निर्माते तेजस्विनी पंडित आणि वरदा नाडियाडवाला’. त्याचबरोबर या चित्रपटाला मराठी सिनेसृष्टीतील गोगावले जोडी म्हणजेच आपले सर्वांचे लाडके अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. सध्याच्या घडीला सर्वचजण फक्त ट्रेलर लॉन्चिंगची वाट पाहत आहेत.
Latest Marathi News | Tejaswini Pandit production Marathi film titled Yek Number 25 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं