Viral Video | विषारी सापाला चाटताना दिसली गाय, मग काय झालं?..हा व्हिडिओ पाहून लोक हैराण

Viral Video | वन्यजीवांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण यादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात साप आणि गाय यांच्यातील प्रेम दिसून येतंय. गाय सापाला वासराप्रमाणे चाटत असते, पण साप त्याच्या स्वभावानुसार तिच्यावर हल्ला करत नाही किंवा चावत ही नाही. लोक या व्हिडिओला भरभरून लाईक्स करत आहेत.
जेव्हा गाय विषारी सापाला चाटते
व्हायरल व्हिडिओमध्ये एक गाय मोकळ्या मैदानात उभी असल्याचे दिसत आहे. तर एक साप जमिनीवर बसून गाईच्या अगदी समोर आहे. पण या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये कोणतेही हल्ले-प्रतिहल्ले होताना दिसत नाहीत. साप गाईला शांत पाहत असल्याचं दिसतंय. गाय देखील सापाला स्वतःच्या वासरा प्रमाणे चाटते आहे. गाय आपली जीभ बाहेर काढते आणि सापाचा चेहरा चाटू लागते. त्यांनंतरही साप अजिबात आवेगात येताना दिसत नाही. तो गायीला स्वत:ला शांतपणे चाटू देतं आहे.
सुशांत नंदा यांनी शेअर केला व्हिडिओ
भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये साप आणि गाय यांच्यातील प्रेम दिसत आहे. हे दृश्य आश्चर्यकारक आहे कारण या दोन प्राण्यांमध्ये आपण यापूर्वी क्वचितच असे काही पाहिले असेल. व्हिडिओ शेअर करताना सुशांतने लिहिले की, “हा सीन समजावून सांगणे कठीण आहे. हा विश्वास निखळ प्रेमाने जिंकला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होत आहे
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, सुशांतचे विधान पूर्णपणे बरोबर आहे. दुसऱ्याने सांगितले की, गाय आणि साप दोघांचीही स्वतःच्या एक भाषा आहे, जी मानवी आकलनाच्या पलीकडची आहे. एका व्यक्तीने सांगितले की, निसर्ग गुंतागुंतीचा आहे. निसर्गाला तुम्ही अनुभवातून समजू शकता…
Difficult to explain. The trust gained through pure love ? pic.twitter.com/61NFsSBRLS
— Susanta Nanda (@susantananda3) August 3, 2023
News Title : Viral Video of Cow and snake check details on 05 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं