#MeToo स्टंट? आलोकनाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्यात आलं असावं: न्यायालय

मुंबई : विनता नंदा यांनी केवळ स्वत:च्या फायद्यासाठी बॉलीवूड अभिनेते आलोक नाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवल्याची शक्यता नाकारत येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी दरम्यान व्यक्त केले. दिग्दर्शक आणि निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथांवर काही महिन्यांपूर्वी #MeToo मोहिमेअंतर्गत बलात्काराचा आरोप केला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध FIR सुद्धा दाखल केला होता.
दरम्यान, स्वतःचा अटकेपासून बचाव करण्यासाठी आलोक नाथ यांनी कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी कायदेशीर अर्ज दाखल केला होता. विनता नंदा यांनी घटनेवेळीच लगेच तक्रार दाखल न केल्याने आरोपांमधील तथ्य वेगळेच असण्याची शक्यता आहे, असे म्हणत न्यायालयाने आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
काही महिन्यांपूर्वी #MeToo मोहिमेअंतर्गत त्यांनी या घटनेचा धक्कादायक खुलासा केला होता. सदर ‘घटनेनंतर लगेचच तक्रार दाखल करण्याबाबत मित्रमैत्रिणींचा सल्ला देखील घेतला होता. तसेच आलोक नाथ ही प्रसिद्ध व्यक्ती असल्याने त्यांच्याविरोधात केलेल्या आरोपांवर कोणीच विश्वास ठेवणार नाही, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे सदर घटनेसंदर्भात तक्रार दाखल न करण्यासाठी अभिनेते आलोक नाथ यांनी नंदांवर कोणत्याही प्रकारचा आणि जाणीवपूर्वक दबाव टाकला होता का? याचे पुरावे नसल्याचे कोर्टाने निकालात स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे #MeToo मोहीम म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेले स्टंट होते का? असा प्रश्न उपस्थित होऊ केला जाऊ लागला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं