कोणत्याही सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घेताना आनंद वाटत असेल का? - नाना पाटेकर

मुंबई, १३ एप्रिल: राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर मतमतांतरे असताना अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोणत्याही सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घेताना आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे असतील, तर हे गरजेचं आहे, असे नाना पाटेकर यांनी म्हटले.
ते सोमवारी पुण्यातील रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांना राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाचे समर्थन केले. राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असून प्रत्येकाने या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
News English Summary: Would any government be happy to decide on a lockdown? I do not belong to any party. But if we want to avoid death, it is necessary, said Nana Patekar.
News English Title: Would any government be happy to decide on a lockdown questioned by Nana Patekar news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं