महत्वाच्या बातम्या
-
भाजप नेत्यांची पोलखोल | ट्विटरकडून कांगावाखोर भाजप नेत्याच्या टूलकिट पोस्टला 'फेरफार मीडिया' शेरा
देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत होते. या टूलकिटवरून भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातील नेत्यांसहित राज्यातील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोह देखील करू शकेल”, अशा शब्दांत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
PIB Fact Check मध्येच गोंधळ | ट्विट केलं डिलीट | गुप्तचर विभाग भरती
सरकारी फॅक्ट चेक करून फेक न्यूजला आळा घालण्यासाठी PIB’ची स्थापना करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आयबी भरतीबाबतच्या जाहिरातींवरून PIB मध्येच गोंधळ असल्याचं पाहायला मिळालं. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये २००० पदांची भरतीची जाहिरात समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि अनेक नोकरी संबंधित वेबसाइट्सने देखील तेच गृहीत धरून वृत्त प्रसिद्ध केलं. मात्र पीआयबीने ती फेक न्युज म्हणून घोषित केलं.
4 वर्षांपूर्वी -
Fake News | सीरम, भारत बायोटेकच्या लसींना इमर्जन्सी वापराची परवानगी नाकारल्याचं वृत्त चुकीचं
कोरोना प्रतिबंधक लसीचा आपातकालीन वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने प्रस्ताव पाठवले होते. पण हे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. लसीची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असे बुधवारी एनडीटीव्हीने सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
भाजप IT Cell अध्यक्षांकडून फेक न्युज प्रसार | ट्विटरकडून छेडछाड मीडियाचा शेरा
भारतीय जनता पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय (IT cell chief Amit Malviya) यांच्या एका ट्विटवर मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ‘ट्विटर’कडून ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’ (microblogging website Twitter as ‘manipulated media’ remark) अर्थात ‘छेडछाड’ करण्यात आल्याचा शेरा दिसून येतोय आणि त्यामुळे समाज माध्यमांवर भारतीय जनता पक्षाची देखील खिल्ली उडविण्यास सुरुवात झाली आहे. समाज माध्यमांतील अग्रगण्य असलेल्या ‘ट्विटर’नं भारतात ‘फेक न्यूज’ लेबल चिटकवण्यास सुरुवात केल्याचं या घटनेमुळे पहिल्यांदाच जनतेच्या ठळ्ळकपणे लक्षात आलंय, असं म्हणायला हरकत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Fake News | पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइकचं वृत्त खोटं | लष्कराची माहिती
भारतीय लष्कराने सीमेपलीकडे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे तळ आज उद्ध्वस्त केले या बातमीत तथ्य नसल्याचं भारतीय लष्कराचे सरव्यवस्थापक लेफ्टनंट जनरल परमजीत सिंह Director General Military Operations (DGMO) यांनी म्हटलं आहे. ‘भारतीय लष्कराने आज कुठलीही कारवाई केली नाही’, असं लष्करानेही स्पष्ट केलं आहे. पण त्याचबरोबर गेल्या आठवड्यातल्या कारवाईच्या बातमीबद्दल मात्र कुठलीही माहिती दिलेली नाही आणि ती कारवाई नाकारलेलीसुद्धा नाही.
5 वर्षांपूर्वी