Face Mask for Blackheads | पार्लमध्ये न जाता चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घरीच घालवा, या विशेष टिप्स फॉलो करा

Face Mask for Blackheads | ‘ताणतणाव’ या शब्दातच खुप मोठा ताणतणाव आहे नाही का? कामाचे प्रेशर म्हणा घरातील धावपळ म्हणा आणि बऱ्याच गोष्टी ज्यामुळे मानसिक त्रास होतो आणि ज्याच्या परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येण्यास सुरुवात होते, डोळ्यांखाली काळे सर्कल होते. तर याला दूर करण्यासाठी उपचाराच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत, परंतु जर तुम्ही स्वस्त आणि प्रभावी पर्याय शोधत असाल तर स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात जे पूर्णपणे नैसर्गिक आणि खूप प्रभावी देखील आहेत.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि सायट्रिक ऍसिड मुबलक प्रमाणामध्ये असते तर टोमॅटोमध्ये असलेले ऍसिड चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करते, तर व्हिटॅमिन त्वचेचे पोषण करण्याचे काम करते.
घरीच फेस पॅक बनवा :
1. लहान टोमॅटो घ्या आणि ते चांगले मॅश करा.
2. मॅश टोमॅटो तुमच्या चेहऱ्यावर किंवा ब्लॅकहेड्सवर लावा आणि हलक्या हातांनी 2 मिनिटे मालिश करा.
3. हे फेस पॅक 15 मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
ग्रीन टी मास्क
फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, ग्रीन टी ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. याशिवाय हे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी काम करते.
असा फेस पॅक बनवा :
1. ग्रीन टी पाण्यात एक तास किंवा 45 मिनिटे भिजवत ठेवा.
2. ते पाणी गाळून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
3. या थंड पाण्यात कापसाचा गोळा बुडवून ब्लॅकहेड्सवर लावून 20 मिनिटे ठेवा.
4. 20 मिनिटानंतर चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
अंड्याचा फेस पॅक :
अंड्यातील पांढरा भाग छिद्रे घट्ट करण्यासाठी खूप प्रभावी असतात आणि यामुळे ब्लॅकहेड्स तर दूर होतातच पण भविष्यात ब्लॅकहेड्स होण्याची शक्यताही कमी होते. यामध्ये प्रथिने आणि इतर अनेक प्रकारची खनिजे असतात, ज्यामुळे तुम्हाला सुरकुत्या मुक्त त्वचा मिळते.
असा फेस मास्क बनवा :
1. अंडी फोडून त्याचा पिवळा भाग वेगळा करा.
2. पांढरा भाग चेहरा आणि मानेवर लावावा.
3. चेहऱ्यावर तीन थर लावायचे, पण पहिला थर सुकल्यावर दुसरा आणि दुसरा सुकल्यानंतर तिसरा लावावा.
4. हा फेस पॅक सुमारे 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
हा पॅक अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही 1/2 टीस्पून लिंबाचा रस आणि 1 टीस्पून मध देखील घालू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Face Mask for Blackheads Checks details 26 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं