Quick Makeup Tips | उन्हाळ्यात मेकअप टिकवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स, चेहरा सतत सुंदर आणि चमकदार राहील

Quick Makeup Tips | आपली त्वचा सुंदर दिसावी यासाठी महिला आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. मेकअप करणे ही एक कला आहे मात्र मेकअप कसा करावा हे प्रत्येकाला माहित नाहीये. ऑफिसला जाण्यापासून ते कॉलेज पर्यंत आपण चेहऱ्यावर मेकअप करत असतो. कधीकधी घाईघाईने केलेला मेकअप आपल्या चेहऱ्याचे नॅचरल सौंदर्य बिघडवतो. मेकअप करण्यासाठी खूप वेळ लागतो असे नाहीये, पण जर मेकअप करायचा असेल तर काही सोप्या मेकअप टिप्सचा फॉलो करून कमी वेळेमध्ये खुप चांगला मेकअप करता येतो. तर चला उन्हाळ्यात झटपट मेकअप कसा करायचा ते जाणून घेऊयात.
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ लावून घ्या:
उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येतो आणि, त्यामुळे मेकअप खराब होण्याची भीती जास्त असते. तसेच तुमचा मेकअप जास्त काळ टिकून रहावा असे वाटत असेल तर मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फाने मसाज करून घ्या. चेहऱ्यावर आयसिंग केल्यामुळे त्वचेवर उघडलेले छिद्र लहान होतात, आणि त्वचा चमकू लागते.
त्वचा टोनर वापरा:
उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावर आयसिंग लावल्यानंतर स्किन टोनिंगही करून घ्या कारण जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही गुलाबपाणी देखील वापरू शकता.
तिसऱ्या क्रमांकावर फाउंडेशन वापरा:
बर्फ लावल्यानंतर आणि टोनर लावल्यानंतरच चेहऱ्यावर फाउंडेशनचा वापर करा आणि तुमच्या त्वचेच्या टोननुसार फाउंडेशन निवडा. तसेच जर तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर असेल तर त्याचा तुम्ही फाउंडेशननंतर वापरू शकता.
डोळ्यांचा मेकअप आवश्यक आहे:
डोळ्यांच्या मेकअपसाठी तुम्ही मस्करा, आयलाइनरचा वापर करू शकता. तसेच तुमच्या भुवयांना परफेक्ट लुक देण्यासाठी, गडद तपकिरी आयब्रो पेन्सिलने डिझाइन करून घ्या.
लिपस्टिकसह पूर्ण मेकअप:
मेकअपला संपूर्ण लुक देण्यासाठी तुमच्या त्वचेनुसार आणि आवडीनुसार लिपस्टिक लावा कारण जर तुमचे ओठ पातळ असतील तर प्रथम लिप लाइनरने आऊटलाइन बनवून ओठांचा आकार निश्चित करून घ्या, मग त्यानंतर लिपस्टिक लावा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Quick Makeup Tips Checks details 20 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं