Skin Friendly Foods | रिंकल फ्री त्वचा कोणाला नाही आवडत, त्यासाठी करा 'हे' उपाय, फरक पहा

1. हिरव्या पालेभाज्या खा :
तुमच्या दैनंदिन आहारामध्ये हिरव्या पालेभाजांचा समावेश असू द्या. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. आपल्या शरिराला व्हिटॅमिन-सी आवश्यकता असते त्यामुळे आहारात पालक, कोळंबी यांचा समावेश करा. या सर्व पालेभाज्या सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे आणि प्रदूषणामुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करत असतात. याशिवाय टोमॅटो आणि सिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन-सी आढळून येते.
2. दालचिनी खा :
दालचिनी मध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींसाठी फायदेशीर आहेत तसेच दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल आढळून येते, पॉलीफेनॉल त्वचेसाठी निरोगी पेशींच्या निर्मितींसाठी मदत करतात. यासाठी दूध घेताना दालचिनीचा वापर करावा.
3. आले आणि मध :
आपल्या आहारामध्ये आले आणि मध यांचा समावेश करावा. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या पृष्ठभागावर असलेले बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात त्याचबरोबर मधामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. तसेच आले आणि मध एकत्र सेवन केल्याने सुरकुत्याच्या समस्येपासून सुटका मिळते.
4. बेरी खा :
आहारामध्ये बेरीचा वापर करा. पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, तसेच पॉलीफेनॉल मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास सक्षम आहे. फ्री रॅडिकल्स आपल्या त्वचेतील कोलेजनचे नुकसान करतात आणि याचा वापर करून तुम्ही सुरकुत्या मुक्त राहू शकता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Skin Friendly Foods beauty tips checks details 28 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
Skin Friendly Foods | दिवसेंदिवस वय वाढत चालले आहे आणि त्वचेच्या समस्याही वाढत चालल्या आहेत मात्र लहान वयात त्वचेच्या उद्धभवलेल्या समस्या चिंतेचे कारण बनू शकतात. चुकीचा आहार, ताणतणाव, हार्मोन्सचे असंतुलन, खराब दिनचर्या या गोष्टींमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि चेहऱ्यावर ठिसूळपणाही वाढतो. मात्र यामुळे तुमच्या चेहऱ्यावर डाग दिसू शकतात तसेच डोळ्यांखाली काळे डाग दिसून येतात. तुम्हाला रिंकल फ्री स्किन, सुरकुत्या मुक्त त्वचा मिळवायची असेल तर या गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा.