Summer Skin Care | उन्हाळ्यात चेहरा कायम टवटवीत राहण्यासाठी उपयुक्त ठरेल हा फेसमास्क, सोपी आहे पद्धत

Summer Skin Care | अतिउष्णतेच्या या दिवसांमध्ये स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. अशात आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे घरगुती उपाय पाहत असतो. त्याचबरोबर अनेक व्यक्तींना पाण्याच्या कमी सेवनामुळे डीहायड्रेशनची समस्या जास्त प्रमाणात होऊ लागते. ज्यामुळे त्यांची त्वचा निस्तेज बनू लागते. आज आम्ही तुम्हाला मधापासून बनवला जाणारा एक फेसमास्क सांगणार आहोत. हा फेसमास्क नियमितपणे वापरल्याने तुमची त्वचा कापसासारखी मऊ पडेल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक व्यक्ती योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करत नाहीत. त्यामुळे त्यांना डीहायड्रेशनची समस्या उद्भवते. पाण्याच्या कमी सेवनामुळे डीहायड्रेशनसह त्वचेच्या देखील अनेक समस्या उद्भवू लागतात. तुमचे शरीर हायड्रेट नसल्याने तुमची त्वचा पूर्णपणे कोरडी आणि निस्तेज बनू लागते. त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यांच्या आसपास फाईन लाईन्स, डोळ्यांखाली काळी वर्तुळे अशा प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. यासाठी तुम्ही मधामध्ये काकडी मिसळवून एक जबरदस्त फेसमास्क तयार करू शकता.
काकडी आणि मधाचा फेसमास्क कसा बनवावा :
मध हे आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्याचबरोबर काकडी सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत गुणकारी. काकडी आणि मधाचा फेसमास्क बनवण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला एक काकडी घ्यायची आहे. तिची साल व्यवस्थित काढून मिक्सरमध्ये तिला बारीक वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर काकडी पल्पमध्ये एक चमचा भरून मध घालायचे आहे. हे मिश्रण एकजीव करून चेहऱ्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर हे मास्क चेहऱ्यावरून रिमूव करायचे आहे.
मास्क रिमुव करून झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. ही होमरेमेडी तुम्हाला प्रत्येक आठवड्यात तीन वेळा करायची आहे. मध तुमच्या त्वचेला मुलायम बनवण्याचे काम करते. त्याचबरोबर काकडी ही तुमच्या त्वचेला थंडावा देते आणि डीहायड्रेशनच्या समस्येपासून वाचवते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Summer Skin Care check details on 16 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं