'रियोन पॉकेट एसी' आता बदलत्या वातावरणाची चिंता नको ...!!

मुंबई : बदलत्या वातावरणात नक्की गर्मी’ला सामोरे जायचे कि थंडीला असा प्रश्न नेहमीच लोकांना पडत असतो. त्यातच गर्मीतल्या उकाड्यावर उपाय करता करताच वेळ निघून जातो. म्हणूनचं जपानची प्रसिद्ध कंपनी सोनी’ने एक खास एअर कंडीशनर उपकरण बाजारात आणलं आहे . ग्राहकांना गर्मीपासून दिलासा देऊ पाहणाऱ्या या उपकरणाच नाव आहे ‘रियोन पॉकेट एसी’.
या एसीचा आकार इतका लहान आहे कि तुम्हाला ती तुमच्या कपड्यांवर सहज बसवता येणार आहे. हे उपकरण सध्या तरी सोनी कंपनीनं फक्त पुरुषांकरीता उपलब्ध केलेला आहे. त्यामुळे पुरुषांच्या शर्ट किंवा टी- शर्टच्या मागच्या बाजूला ते सहज रित्या बसवता येणार आहे. त्यामुळे आता उकाड्याची चिंता सोडून द्या. कारण जिथे जाल तिथे तुमचा हक्काचा एसी तुमच्या सोबत घेऊन फिरत येणार आहे. या एसीचा एक खास वैशिष्ठ्य म्हणजे हि एसी गर्मी मध्ये थंड हवा देते तर थंडी माजे गरम हवा देते. त्यामुळे आता दोन्ही ऋतूंमध्ये आपल्याला आरामदायी वातावरणात आपल्याला जगता येणार आहे.
हे उपकरण मोबाईलद्वारे कंट्रोल करता येणार असून वापरण्यासाठी ते अगदी सोप्या पद्गतीचा आहे. एका मोबाईल अँपद्वारे या उपकरणाचे तापमान कमी जास्त करता येणार आहे. एका विशिष्ठ एसी पेल्टियर घटकापासून हे उपकरण तयार करण्यात आला आहे. ज्यामुळे हे लगेचच थंड किंवा गरम होण्यास मदत होते व आपल्याला हवे तसे तापमान आपल्याला पुरवते. एसी पेल्टियर या घटकाचा वापर प्रामुख्याने कार किंवा कुलर्स मध्ये केला जातो. तापमानात होणाऱ्या बदलानुसार लोकांना होणार त्रास लक्षात घेऊन कंपनीने हे उपकरण बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्राहकांना आल्हाददायक जीवन जगाता येईल. वेगवेगळ्या ऋतूंचा अडथळा त्यांच्या दैनदिन जीवनास होणार नाही आणि जीवन सुखी होईल.
सोनीने या एअर कंडीशनरला क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म वर लॉँच केला आहे. जसजसा तंत्रज्ञानात होण्याऱ्या बदलामुळे मोठा असणारा संगणक आता मोबाईलद्वारे लोकांच्या हातात येऊन पोहोचला आहे तसेच भिंतीवरची एसी आता लोकांना पाठीवर घेऊन फिरता येणार आहे. या आधुनिक उपकरणात लिथियम आयन बॅटरी चा वापर करण्यात आला आहे. साधारण दोन तास व्यवस्तित चार्ज केल्यानंतर हे उपकरण ग्राहकांना दिवसभर वापरता येणार आहे. हे उपकरण ब्लूटूथ ५.० LE कनेक्टेड फोनेला समर्थन करते. हा एसी जलरोधक नाही, परंतु सहज पुसता येण्यासारखे आहे. याची किंमत साधारण ९००० रुपये इतकी असणार आहे. हे उपकरण लवकरच भारतात येणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं