Samsung Galaxy A05s | दमदार बॅटरीसह 50 MP कॅमेरा, नवा Samsung Galaxy A05s स्मार्टफोन लाँच होतोय, मिळणार जबरदस्त फीचर्स

Samsung Galaxy A05s | सणासुदीच्या काळात तुम्ही बजेट रेंजमध्ये सॅमसंग फोनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सॅमसंग A05s हा फोन १८ ऑक्टोबररोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. भारतात येण्यापूर्वी मलेशियात या फोनची विक्री सुरू आहे. भारतीय बाजारपेठेसाठी सॅमसंग A सीरिजच्या नव्या फोनची किंमत अद्याप समोर आलेली नाही. आगामी फोन बजेट रेंजमध्ये येण्याची शक्यता आहे.
स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
सॅमसंगच्या या नव्या फोनचा डिस्प्ले साइज ६.७ इंच असेल. फुल एचडी+ एलसीडी डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ असेल. यात पंच होल डिझाइन असेल ज्यात फ्रंट कॅमेरा फिट होईल. चांगल्या परफॉर्मन्ससाठी 6 एनएम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट मिळेल. आगामी फोनमध्ये ६ जीबी रॅम असणार आहे. फोटो, व्हिडिओ ठेवण्यासाठी फोनमध्ये १२ जीबीपर्यंत स्टोरेज क्षमतेचा पर्याय असेल.
फोटोग्राफीच्या बाबतीत यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स असेल. नव्या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. दीर्घकालीन वापरासाठी फोनमध्ये ५,००० एमएएचची बॅटरी असेल. ज्यात चार्जिंगसाठी २५ वॉट वायर्ड चार्जिंग सपोर्ट मिळेल. सॅमसंग गॅलेक्सीचा आगामी ए सीरिजचा फोन ब्लॅक, सिल्व्हर, लाइट ग्रीन आणि व्हायोलेट अशा एकूण ४ कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.
नव्या फोनची किंमत?
भारतीय बाजारात येणाऱ्या सॅमसंग गॅलेक्सी A05s फोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल. आणखी एका रिपोर्टनुसार या नवीन सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजच्या फोनची किंमत 12,999 च्या आसपास असेल. फोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्सनुसार अंदाजित किंमत सांगितली जाते. सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजच्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमती अद्याप अधिकृतरित्या समोर आलेल्या नाहीत. लाँचिंगनंतर फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबाबत गोष्टी स्पष्ट होतील.
News Title : Samsung Galaxy A05s smartphone price in India 15 October 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं