Vivo V25 Pro Smartphone | विवो V25 प्रो भारतात लाँच, रंग बदलणाऱ्या फोनमध्ये 66 वॉट फास्ट चार्जिंग

Vivo V25 Pro Smartphone | विवो V25 प्रो अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 35,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला असून हा फोन 25 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ३५,९ रुपये असून याच्या १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९,९ रुपये ठेवण्यात आली आहे. पण खास गोष्ट म्हणजे विवो व्ही 25 प्रो 3,500 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये घरी आणता येईल, ज्यासाठी एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर तुम्हाला आणता येईल.
Vivo V25 Pro मध्ये 6.55 इंचाचा फुल-एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 2,376×1,080 पिक्सल आहे. फोनचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा कलर चेंजिंग रियर ग्लास पॅनलसोबत येतो. हे मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 1300 प्रोसेसरसह सुसज्ज आहे, जो 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो आणि फनटचोस 12 वर चालतो.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप :
कॅमेरा म्हणून फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स दिला आहे. फ्रंटमध्ये ऑटोफोकस आणि एफ/२.४५ अपर्चरसह ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
कनेक्टिव्हिटी म्हणून, फोनमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय (२.४ गिगाहर्ट्झ आणि ५ जीएचझेड), ब्लूटूथ व्ही ५.२, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सपोर्ट केला आहे. या फोनमध्ये ड्युअल-सिम (नॅनो) स्लॉट आहे, आणि हा फोन 5 जी नेटवर्कला सपोर्ट करतो, फिंगरप्रिंट स्कॅनर विवो व्ही 25 प्रो मध्ये देण्यात आला आहे. पॉवरसाठी, यात 4,830 mAh ची बॅटरी आहे, जी 66 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनचे वजन १९० ग्रॅम आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Vivo V25 Pro Smartphone launched in India check details 17 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं