Coffee for Skin Care | पिंपल्स आणि डार्क सर्कलसाठी गुणकारी आहे कॉफी - नक्की वाचा

मुंबई, २४ ऑगस्ट | तुमच्या चेहऱ्यांवर डाग आणि डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर तुमच्यासाठी महत्वाचा विषय आहे. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते. विशेषबाब म्हणजे कॉफी डार्क सर्कल्सपासून ते पिंपल्सपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करते.
पिंपल्स आणि डार्क सर्कलसाठी गुणकारी आहे कॉफी – Coffee beneficial for Skin Care in Marathi :
तज्ञांच्या मते, तुम्ही कॉफी आपल्या स्कीनकेअरच्या नित्यक्रमात कॉफीचा समावेश करू शकता. कॉफी फेस पॅकचा वापर केल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले होतात. तसेच अनेक समस्यापासून सुटका मिळू शकते. कॉफी त्वचेसाठी कशी फायदेशीर आहे आणि ती कशी वापरली जाऊ शकते. जाणून घेऊया.
डार्क सर्कल:
कॉफीमध्ये नैसर्गिकरित्या ब्लीचिंग एजेट असतात. तुम्ही एक चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा मध आणि व्हिटॅमिन ई तेलाचे काही थेंब मिक्स करावे. हे मिश्रण काळजीपूर्वक आपल्या डोळ्याखाली लावावे. हे मिश्रण 15 मिनिटे ठेवावे. नंतर स्वच्छ धुवावे.
सेल्युलाईट कमी:
कॉफीमध्ये असलेले कॅफिन रक्ताभिसारण सुधारून सेल्युलाईट कमी करण्यास मदत करते. एका बाउलमध्ये 1/4 कप कॉफी आणि 3 चमचे कोरफड जेल मिक्स करा. आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर स्क्रब लावा. तसेच 10 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करावी. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावे. या स्क्रबद्वारे चांगली मसाज केल्यामुळे पेशी उत्तेजित होतात. तसेच त्वचेला निरोगी बनवते आणि ग्लोइंग होते.
कॉफी डार्क सर्कल्सपासून ते पिंपल्सपर्यंत त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करते – Benefits of Coffee for skin care in Marathi
एटी एजिंग:
कॉफीच्या फेस पॅकमुळे तीव्र सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसणापासून बचाव करते. यासाठी एका बाउलमध्ये कॉफी पावडर, कोको पावडर मिक्स करावे. नंतर त्यात थोडे दूध मिक्स करून फेसपॅक तयार करावा. या मिश्रणात 2 थेंब मध आणि लिंबाचा रस घालावा. आता हे पॅक चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवावे. यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
पिंपल्सवर गुणकारी:
कॉफीच्या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कारण कॉफीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणाचा समावेश असतो. यासाठी एका बाउलमध्ये 3 चमचे कॉफी पावडर आणि 2 चमचे ब्राऊन शुगर मिक्स करावे. त्यात 3 चमचे नारळ पाणी घालावे. याचे मिश्रण चांगले मिक्स करा. या फेस पॅकने चेहऱ्यावर चांगले मसाज करा. 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत मिळते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Coffee beneficial for Skin Care in Marathi.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं