Health First | जाणून घ्या मूळव्याध्याची कारणे आणि त्यावरील उपचार

मुंबई २६ मे : मूळव्याधीचा त्रास हा वेदनादायी आणि इम्बॅरेसिंग असल्याने त्याबद्दल खुलेपणाने फारसे बोलले जात नाही. खाण्या-पिण्याच्या हानीकारक सवयींमुळे मूळव्याधीचा त्रास अचानक जाणवतो आणि अल्पावधीतच त्रासदायक होऊन जातो. शौचाच्या वेळेस तीव्र वेदना होण्यासोबतचरक्त पडण्याची समस्या वेळीच उपचार न केल्यास अधिक गंंभीर होऊ शकते. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
मूळव्याध होण्याची कारणे:
मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो असे दिसून येते. दाब वाढल्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात व सुजतात.
मूळव्याध होण्याचा धोका खालील कारणांमुळे वाढू शकतो:
- अतिरिक्त वजन किंवा स्थूलपणा
- आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव व त्यामुळे सतत बद्धकोष्ठ असणे.
- दीर्घकालीन जुलाब
- सतत जड वस्तू उचलणे
- सतत खोकला किंवा वारंवार उलट्या
- बैठी जीवनशैली
- गर्भावस्था – बाळाच्या जन्मानंतर बरेचदा रक्तस्त्राव थांबतो.
४५ वर्षापेक्षा जास्त वय:
जसे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीराचे स्नायू, रक्तवाहिन्या व आधार देणारे इतर अनेक घटक कमकुवत होत जातात आणि मूळव्याध होण्याचा धोका वाढत जातो.
अनुवंशिकता
मूळव्याधीवरील उपचार:
मूळव्याधीचा त्रास बरेचदा कोणत्याही उपचाराशिवाय काही दिवसात बरा होतो. परंतु गुदद्वाराजवळील खाज आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.
सर्वप्रथम आहारातील बदल आणि शौचाच्या वेळी जोर न करणे हे सांगितले जाते.
आहारातील बदल व स्वतः घ्यायची काळजी:
आपल्याला होणारा मूळव्याधीचा त्रास बद्धकोष्ठामुळे असेल तर शौच नियमित व सुलभ होणे आवश्यक आहे. यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागणार नाही.
* यासाठी आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण हळूहळू वाढवावे – फळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये इ. पदार्थ तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत.
* भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफीचे सेवन टाळावे. मद्यपान टाळावे.
शौचाच्या वेळी खालील काळजी घ्यावी:
* शौचाच्या वेळी कुंथू नये / जोर करु नये
.
* शौचानंतर मऊ toilet paper वापरावा.
* शौचानंतरची स्वच्छता हळुवारपणे करावी.
News English Summary: Hemorrhoids are painful and embarrassing and are not talked about much. Harmful eating and drinking habits can lead to sudden onset of hemorrhoids and short-term hemorrhoids. Acute pain during defecation can be exacerbated if left untreated. So consult a doctor if you are suffering from hemorrhoids
News English Title: Do home remedies for piles or hemorrhoids news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं