Special Recipe | घराच्या घरी बनवा एग पोटॅटो कबाब | सोबत झणझणीत पुदिना चटणी, सॉस

मुंबई, २३ जुलै | घरी एखादा कार्यक्रम म्हटला की साधारणपणे १० ते १५ माणसं सहज जमतात. मग, या सगळ्यांच्या जेवणाची, स्नॅक्सची काही तरी सोय करावी लागते. त्यातच दरवेळी बाहेरुन आणणं शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या झेपणारंही नसतं. त्यामुळेच यावेळी घरी पार्टी असेल तर घरच्या घरीच एग पोटॅटो कबाब तयार करा आणि सहकुटूंब चव अनुभवा;
संपूर्ण साहित्य:
* अंडी – ४
* बटाटे – २
* ब्रेड – ५
* तिखट – ४ चमचे
* मीठ – १ चमचा
* गरम मसाला – २ चमचा
* धणेपूड, जिरेपूड -२ चमचे
* आलं-लसूण पेस्ट – १ चमचा
* काळीमिरी पूड – अर्धा चमचा
* तळलेला कांदा – अर्धा कप
* कोथिंबीर – अर्धा कप
* ब्रेडक्रम्स – १ कप
संपूर्ण कृती:
* सगळ्यात आधी ३ अंडी व २ बटाटे उकडून किसून घ्या.
* तयार किसामध्ये मीठ, मिरपूड, तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला,हळद, तळलेला कांदा आणि आलं-लसूण पेस्ट टाका व छान मिक्स करुन घ्या.
* कबाबचं हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे लहान लहान गोळे करा.
* हे गोळे करताना मिश्रण हाताला चिकटत असेल तर थोडा तेलाचा हात घ्या.
* त्यानंतर या गोळ्यांना कबाबचा आकार द्या. कबाब तयार झाल्यानंतर फेटलेल्या अंड्यात ते घोळवून घ्या.
* त्यानंतर ब्रेडक्रम्समध्ये छान कोट करा.
* सगळे कबाब फेटलेलं अंड व ब्रेडक्रम्समध्ये कोट झाल्यावर त्यांना १० मिनीटे फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर डीप फ्राय करा.
(सुरुवातीला हाय फ्लेमवर तेल तापवून घ्या व नंतर स्लो टू मिडीअम फ्लेमवर कबाब तळून घ्या.)
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Egg potato Kabab recipe in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं