Health First | बऱ्याच काळापासून आहे कोरडा खोकला? हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा

मुंबई, २४ जुलै | आजकाल सर्दी किंवा खोकला होणे ही सामान्य बाब आहे. बदलते हवामान आणि पावसामुळे काही लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. कोरोनाच्या या काळात जर हा खोकला बराच काळ राहिला तरी त्याबद्दल काळजी वाटू लागते. आपल्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे की काय अशी भीतीही वाटू लागते. त्यामुळे आम्ही आपल्याला सांगणार आहोत असे काही घरगुती उपाय ज्यामुळे आपला कोरडा खोकला लवकर बरा होईल.
ज्येष्ठमध, मध आणि आल्याचा करा वापर:
आल्यात अनेक औषधी गुण असतात. यातल्या किटाणूविरोधी गुणांमुळे सर्दी, खोकल्यासारख्या आजारांपासून आराम मिळतो. मधातही हे आजार बरे करण्याचे गुण असतात. याचे सेवन केल्याने खोकला लवकर बरा होतो. ज्येष्ठमधातही असे गुण असतात जे आपल्या गळ्याचे आजार बरे करण्यास सहाय्यकारी असतात. यातली सर्वात चांगली गोष्ट अशी की या सर्व गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात. तसेच यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
असे करा आले, ज्येष्ठमध आणि आल्याचे सेवन:
कोरडा खोकला बरा करण्यासाठी सर्वात आधी एक चमचा मध घ्या आणि त्यात थोडा आल्याचा रस मिसळा. दोन्ही चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि हे मिश्रण प्या. थोड्या वेळाने ज्येष्ठमधाचा छोटा तुकडा तोंडात धरा. असे केल्याने याचा थोडा थोडा रस आपल्या तोंडात राहील आणि घसा सुकणार नाही. तसेच आल्यासोबत मीठ घेऊन ते दाढेखाली दाबून ठेवा. 5 मिनिटांनी चूळ भरा. यामुळेही कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच रोज सकाळी ज्येष्ठमधाचा चहा किंवा याची वाफ घेतल्यानेही कोरडा खोकला बरा होतो.
पिंपळाच्या गाठीचा करा वापर:
पिंपळाची गाठ ही कोरडा खोकला बरा करण्यात उपयुक्त असते. सर्वात आधी एक चमचा मध घ्या आणि यात पिंपळाची गाठ बारीक करून घाला. हे मिश्रण खाल्ल्याने आपल्याला कोरड्या खोकल्यापासून तात्काळ आराम मिळेल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Home Remedies on Dry Cough in Marathi news updates.
ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अॅप डाऊनलोड करा: Click Here to Download
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं