Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय कराल? | घरी असल्यास कोणती खबरदारी घ्याल? | शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय कराल? | घरी असल्यास कोणती खबरदारी घ्याल? | महाराष्ट्रनामा – मराठी
2 May 2025 4:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर काय कराल? | घरी असल्यास कोणती खबरदारी घ्याल?

Oxygen shortage

मुंबई, २५ एप्रिल: कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे महाराष्ट्र आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य मंत्रालयाने काही नव्या सूचना जारी केल्या आहेत.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली तर Proning केल्यास (पोटावर झोपून) फायदा होऊ शकतो. डॉक्टरांनीही Proning फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यास Proning करुन ही प्राणवायूची पातळी पुन्हा पूर्ववत होऊ शकते. तुम्हाला श्वसनाचा विकार असेल किंवा शरीरातील ऑक्सिजनचा स्तर 94 च्या खाली गेला तर अशा स्थितीत Proning फायदेशीर ठरू शकते. कृत्रिम ऑक्सिजन उपलब्ध होईपर्यंत Proning करुन रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो.

Proning नेमकं कसं कराल?
Proning करण्यासाठी रुग्णाला पोटावर झोपवा. त्यानंत रुग्णाच्या मानेखाली एक उशी द्या. तसेच त्याच्या पोटाखाली आणि पायाच्या खाली दोन उशा ठेवा. अशा स्थितीत रुग्णाला सतत श्वास घ्यायला सांगा. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी पूर्ववत होण्यास मदत होईल. मात्र, 30 मिनिटांपेक्षा Proning करु नये, अशी सूचनाही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच जेवल्यानंतर लगेच Proning करू नये. तर गर्भवती महिलांनी Proning अजिबात करु नये.

काय सांगतात तज्ज्ञ?

  • कोरोना व्हायरसच्या प्रसारानं संपूर्ण जगभरात कहर केला आहे. ऑक्सिजनची कमतरता, बेड्सचा तुटवडा, रेमडेसिविरची टंचाई यांमुळे संपूर्ण जगभरात ताण तणावपूर्ण वातावरण आहे. अशा स्थितीत हेल्थ एक्सपर्ट्सनी लोकांना घरीच रिकव्हर होण्याचा सल्ला दिला आहे.
  • डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार श्वास घ्यायला त्रास झाल्यास सगळ्यांनी रुग्णालयात येण्याची काहीही गरज नाही. ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेव्हल सतत ९० च्या खाली जात असेल तेव्हाच रुग्णालयात जायला हवं. या व्यतिरिक्त श्वास घ्यायला त्रास होत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
  • WEBMD च्या रिपोर्टनुसार शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासल्यास गॅस, स्टोव्ह, मेणबत्ती, फायरप्लेस, गॅस हीटर अशा वस्तूंपासून जवळपास ५ फूट अंतर ठेवायला हवं. कारण ज्वलनशील वस्तूंच्या जवळ गेल्यास त्रास अधिक वाढण्याचा धोका असतो.
  • पेंट थिनर, एरयोसोल स्प्रे, क्निनिंग फ्डूल यांसारख्या ज्वनलशिल पदार्थांचा उपयोग करू नये. याशिवाय पेट्रोलियम, ऑईल, ग्रीस बेस्ड क्रिम किंवा वॅसलिन कोणतंही प्रोडक्ट छातीच्या कोणत्याही भागावर लावू नये.
  • श्वास घ्यायला त्रास होत असेल तर धुम्रपान करू नये. सिगारेट बीडी पीत असलेल्यांपासून लांब राहावे. इतकंच नाही तर सुगंधित अगरबत्ती किंवा धूप याचा वापर टाळावा.
  • ऑक्सिजन कॉन्सनटेटर्सचा वापर करत असाल तर खिडक्या, दरवाजे उघडे असायला हवेत. ताजी हवा मिळाल्यानंतर कॉन्सनटेटर्स आपलं काम अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतील.जर होम क्वारंटाईन असाल तर जास्तीत जास्त झाडांजवळ राहण्याचा प्रयत्न करा. असं केल्यानं तुम्ही नेहमी फ्रेश राहाल.
  • lunginstitute.com नं दिलेल्या माहितीनुसार काही खास व्यायाम प्रकार आपली श्वसन क्षमता चांगली बनवण्यासाठी प्रभावी ठरतात. म्हणून तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रोज व्यायाम करायला हवेत. स्वतःला डिहायड्रेट होऊ देऊ नका, जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. मेडिटेशन केल्यास उत्तम ठरेल. त्यामुळे ताण तणाव कमी होण्यास मदत होईल. ताज्या भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

शरीरात ऑक्सिजन पातळी कमी होतेय?

  • ऑक्सिजन सॅच्यूरेशन काय आहे? ऑक्सिजन सॅच्यूरेशन फुस्फुस आणि इतर शरीराला जाणारं रक्तातील हिमोग्लोबिन पातळी वाढवतं. शरीरातील यंत्रणा सुरळीत करण्यासाठी मदत करतं. रिडिंगमध्ये ९४ पेक्षा जास्त पातळी असणारे धोक्याचे बाहेर असतात. कोरोना झाल्यानंतर शरीरातील ऑक्सिजन पातळी वेगाने कमी होते.
  • तज्ज्ञांच्या मते, SpO2 पातळी ९४ ते १०० मध्ये असणं हे निरोगी असण्याचे संकेत आहेत. तर ९४ च्या खाली गेल्यास ते हायपोस्केमिया ट्रिगर करू शकतं. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. जर ऑक्सिजनची पातळी ९० च्या खाली गेली तर धोक्याची घंटा आहे. तुम्हाला तातडीनं उपचाराची गरज भासेल.
  • इंटेसिव ऑक्सिजन सपोर्ट – श्वास घेण्यास अडचण, छातीत दुखणे हे शरीरातील ऑक्सिजन खालावण्याचे संकेत आहेत. काही रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालवल्याने त्यांना रेस्पिरेटरी इंफेक्शनचा त्रास होतो. शरीराती ऑक्सिजनचा कमतरता आणि श्वास घेण्यास अडचण योग्य पद्धतीने थांबवू शकतो. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. रुग्णांची अवस्था गंभीर असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं लागेल.
  • जर तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९५ च्या वर असेल तर घाबरण्याची गरज नाही. जर ऑक्सिजन पातळी ९१-९४ मध्ये असेल तर शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर ऑक्सिजन पातळी १-२ तास सलग ९१ च्या खाली जात असेल तर तात्काळ उपचारांची गरज आहे.
  • कोरोना व्हायरसच्या सामान्य लक्षणांबाबत सगळेच जागरूक आहेत. परंतु यात काही अशी लक्षणं आहेत जे लोकांच्या नजरेस येत नाहीत. चेहऱ्यांवरील रंग उडणे, होठांवर निळेपणा, रक्तात ऑक्सिजन कमी होण्याचे प्रमाण, हेल्दी ऑक्सिजेनेटेड ब्लडमुळे आपली त्वचा लाल अथवा गुलाबी रंगाशी जुळते.
  • कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक खालावते. त्यावेळी छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास आणि वारंवार खोकल, अस्वस्थपणा, डोकेदुखी अशी लक्षणं आहेत. अशावेळी तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल होणं गरजेचे आहे.

 

News English Summary: The spread of the corona virus has wreaked havoc around the world. Lack of oxygen, scarcity of beds, scarcity of remedivir is a stressful environment all over the world. In such a situation, health experts have advised people to recover at home.

News English Title: Home remedies to control oxygen level during corona pandemic in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

x