आज राज्याचा अर्थसंकल्प | तत्पूर्वी विधानसभा आणि विधानपरिषदेतील 36 कर्मचारी कोरोनाबाधित

मुंबई, ०८ मार्च: विधिमंडळात सोमवारी (ता.८) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे वर्ष २०२०-२१ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे राज्यातील उद्योग, व्यापार थंडावलेला आहे, अशा स्थितीत पवार हे राज्यातील जनतेला इंधनावरील कर व वीज दरात सवलत देऊन दिलासा देणार का, याविषयी उत्सुकता लागली आहे. दुपारी २ वाजता अजित पवार विधानसभेत तर विधान परिषदेत शंभुराजे देसाई अर्थसंकल्प मांडतील.
मात्र त्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेमधून 6 व 7 मार्चला 2,746 कर्मचारी नेत्यांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये 36 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. यामुळे आजच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2,746 samples received from Maharashtra Assembly on 6th & 7th March, 36 tested positive for COVID, ahead of Budget session: JJ Hospital, Mumbai
— ANI (@ANI) March 8, 2021
यानंतर विधानसभा आणि विधानपरिषदेतील 36 कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट आहे. राज्यातही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडू लागल्याने लॉकडाऊन पडणार की निर्बंध वाढणार याबाबत उलटसुटल चर्चा सुरु झाल्या आहेत. यामुळे राज्यातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत.
News English Summary: Deputy Chief Minister and Finance Minister Ajit Pawar will present the state budget for the year 2020-21 in the legislature on Monday. In a situation where industry and trade in the state has cooled down due to Corona, there is curiosity as to whether Pawar will provide relief to the people of the state by giving relief in fuel tax and electricity rates. Ajit Pawar will present the budget in the Legislative Assembly and Shambhuraj Desai in the Legislative Council at 2 pm.
News English Title: Maharashtra Assembly 36 tested positive for COVID ahead of Budget session said JJ Hospital news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं