देशात येत्या ६ ते ८ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार | लाट रोखणं अशक्य - एम्स प्रमुखांचा इशारा

नवी दिल्ली, १९ जून | कोरोनाची दुसरी लाट सध्या देशात ओसरू लागली आहे आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेने ऑक्सिजन आणि इतर महत्वाच्या विषयांवरून देशात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं. मात्र, आता कोरोनाची तिसरी लाट देशात येणार आहे. येत्या 6 ते 8 आठवड्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून ही लाट रोखणं अशक्य असेल, असा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.
देशातील जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करून हे मोठं आव्हान आहे. कोविशिल्ड व्हॅक्सिनच्या दोन लसींच्या दरम्यान गॅप वाढवण्यात आला आहे. ते चुकीचं नाही. उलट त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येणार आहे, असं रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.
रणदीप गुलेरिया यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना तिसऱ्या लाटेचा इशारा दिला. आपण अनलॉक करायला सुरुवात केली आहे. मात्र, पुन्हा एकदा कोविड प्रोटोकॉलची कमतरता भासत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान जे झालं त्यातून आपण अजूनही धडा घेतलेला नाहीये. पुन्हा गर्दी वाढत असून लोक जमायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर कोरोनाची संख्या वाढण्यास वेळे लागेल. येत्या सहा ते आठ आठवड्यात हे होऊ शकतं किंवा त्याला विलंब होईल, असं गुलेरिया यांनी स्पष्ट केलं
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Third Wave Inevitable could hit India In 6 To 8 Weeks said Dr Randeep Guleria news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं