Health First | कारल्याचा कडवटपणा असा दूर करून भाजीचा आनंद घ्या - वाचा टिप्स

मुंबई, २७ जून | कारले चवीला अतिशय कडवट असते पण आरोग्यासाठी मात्र अतिशय गुणकारी असते. मात्र कडवटपणामुळे घरात कोणालाच कारल्याची भाजी खायला आवडत नाही. वास्तविक या भाजीमध्ये भरपूर अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन, बीटा कॅरेटीन, लोह, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फ्लेव्होनॉईड असे अनेक गुणकारी घटक असतात. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या सर्व घटकांशी शरीराला गरज असते.
का खावी कारल्याची भाजी:
कारल्याची भाजी खाण्यामुळे सहज आरोग्याला पोषक घटक तुमच्या शरीराला मिळू शकतात. ज्यामुळे कोणतेही औषध न घेताही तुम्ही आजारपणापासून दूर राहू शकता. सध्या कोरोनाच्या काळात प्रतिकार शक्ती मजबूत असण्याची गरज प्रत्येकाला आहे. शिवाय ज्यांना मधुमेह अथवा सांधेदुखी आहे अशा लोकांसाठीही कारले फायदेशीर ठरते. शिवाय या भाजीमुळे तुमची पचनशक्ती सुधारते. कारल्याचा रस पिण्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होतात. पण जर तुम्हाला कारले कडू लागते म्हणून आवडत नसेल तर काही टिप्स फॉलो करून तुम्ही कारल्याचा कडूपणा कमी करू शकता. यासाठी जाणून घ्या कारल्याचा कडूपणा कसा कमी करावा.
कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी सोप्या टिप्स:
* कारल्याची भाजी जर योग्य पद्धतीने केली तर ती कडू न लागल्यामुळे घरातील सर्व हसत हसत कारल्याची भाजी खाऊ शकतात. यासाठी फॉलो करा या टिप्स
* सर्वात महत्त्वाची आणि पारंपारिक टिप म्हणजे कारली चिरून घेताना त्यात मीठ घालून ती पिळून घेणे. यामुळे कारल्यातील सर्व कडूपणा कमी होतो.
* कारले स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यावरील काटेरी भाग चाकूने काढून टाका. यामुळे तुम्ही केलेली कारल्याची भाजी कमी कडू लागेल
* कारल्याची भाजी केल्यावर ती परतून गॅस बंद करण्यापूर्वी त्या भाजीत थोडा गुळ टाका. गुळाचा गोडवा कारल्याचा कडूपणा कमी करेल.
* कारल्याचा कडूपणा हा त्याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असतो. यासाठी भाजी करताना अथवा कारल्याचा ज्युस करताना कारलं सोलून त्यामधील बिया काढून टाका.
* कारल्याची भाजी करताना ती तव्यावर चांगली परतून घ्या. या पद्धतीने भाजी कोरडी होईल त्यामधील रस सुकून गेल्यामुळे आणि कारली चांगली परतली गेल्यामुळे त्याचा कडूपणा कमी होईल.
* कारल्याची भाजी करताना कारली स्वच्छ धुवून, चिरून दह्यात मॅरिनेट करा. ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. मात्र काही जण कारल्यासोबत दही खाऊ नये असा सल्ला देतात. त्यामुळे या गोष्टींचा नीट विचार करून कारलं दह्यासह खा.
* भाजीसाठी कारल्याच्या फोडी चिरून आणि पिळून घेण्यापूर्वी त्यात मीठासोबत थोडी साखर आणि व्हिनेगर वापरा. ज्यामुळे भाजी कडू होणार नाही.
* कारली गरम पाण्यात उकडल्यामुळे कारल्याचा कडूपणा काही प्रमाणात नक्कीच कमी होतो.
* कारले सोलून त्याला कणीक आणि मीठ लावून ठेवावे आणि मग ते धुवून घ्यावे
* कारले उभे चिरून तांदळाच्या पाण्यात भिजत ठेवल्यास कारल्याचा कडूपणा कमी होतो.
* कारले मसाले टाकून परतावे आणि त्यात शेंगदाण्याचा कुट टाकावा ज्यामुळे कारल्याची भाजी कडू होत नाही.
* कारले कमीम कडू लागावे यासाठी कारल्याच्या भाजीत आमचूर पावडर टाका.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Tips for removing bitterness of bitter gourd Karela health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं