Health First | पावसाळ्यात तांदळाला किड्यांपासून असं वाचवा | 'या' आहेत सोप्या टीप्स

मुंबई, २३ जुलै | पावसाळ्यात ओलाव्यामुळे अन्नधान्याला किड लागते. हे किडे अन्नधान्याच्या पौष्टिकता कमी करुन त्यांची चव बिघडवतात. विशेषतः तांदुळात लागलेल्या किडीने पूर्ण तांदूळ खराब होते. यामुळे ओलाव्याने तांदूळ खूप लवकर खराब होतात. ती खाण्यालायक राहत नाहीत. धान्य आणि डाळी नेहमी हवाबंद डब्यात थंड आणि कोरड्या जागेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण ओलावा आत जाऊ नये, ज्यामुळे किड्यांपासून त्यांचा संरक्षण होईल. मात्र बऱ्याचदा सगळी काळजी घेऊनही तांदळाला किडे लागून ती खराब होतात. अशा स्थितीत काही सोपे टीप्स लक्षात ठेवल्यास तांदळाला किडे लागणार नाहीत. ते जास्त काळ साठवून ठेवता येऊ शकते.
तेज पत्ता आणि कडूलिंबाच्या पानांचा वापर:
तांदळाला किडीपासून बचावासाठी तिच्या डब्यात काही तेज पत्ते आणि कडुलिंबाचे वाळलेले पाने ठेवा. तेज पत्ता तांदळाला किड्यांपासून वाचवण्याची एक चांगली पद्धत आहे. कारण किड्यांना त्यांचा वास आवडत नाही. तसेच सुगंध उग्र असल्याने ती पळून जातात. कडुलिंबाचे पानामुळे किटकांचे अंड नष्ट करतात. तांदूळातून किडे पूर्णपणे निघून जातात. चांगल्या परिणामांसाठी तांदूळ हवाबंद डब्यात तेज पत्ते आणि कडूलिंबाचे पत्ते टाकून ठेवून द्या.
लवंगचा करा वापर:
लवंगाच्या वासाने किडे दूर पळतात. हा चांगला उपाय आहे. जर तुम्हाला तांदळाला किड्यांपासून बचाव करायची असेल तर डब्यात १० ते १२ लवंग टाकून ठेवा. तांदळाच्या डब्यात किडे असतील ती निघून जातात. जर ती नसतील तांदळाचा त्यांच्यापासून बचाव होतो. तसेच तुम्ही डब्यात लवंगाच्या तेलाचे काही थेंब टाकू शकता.
तांदूळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा:
जर तुम्ही काही प्रमाणात तांदूळ दुकानातून खरेदी केला असेल तर ती पावसाळ्यात किड्यांपासून वाचवण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे. तांदूळ घरी आणताच फ्रिजरमध्ये ठेवून दिल्यास त्यातील किडे आणि त्यांची अंडी थंड तापमानामुळे नष्ट होतात. तसेच पावसाळ्यात शक्यतो मोठ्या प्रमाणावर तांदूळ खरेदी करु नका.
लसणाच्या पाकळ्या:
तांदळाला किड्यापासून वाचवण्यासाठी डब्यात लसणाच्या साधारण ५ ते ६ पाकळ्या टाकाव्यात आणि चांगल्याप्रकारे मिसळून टाका. जेव्हा या पाकळ्या वाळून जातील तेव्हा त्या काढून नवीन पाकळ्या टाकाव्यात. लसणाच्या उग्र वासामुळे तांदळाला किडीपासून संरक्षण मिळते.
तांदळाच्या डब्याजवळ आगपेटी ठेवा:
आगपेटीत सल्फर असते. ते तांदूळ तसेच इतर धान्यातील किडे पळवण्यास मदत करते. तुम्ही कुठेही तांदूळ ठेवाल तेथे आगपेटीतील काडी ठेवा. त्यामुळे किडे पळून जातील.
तांदूळ उन्हात ठेवा:
जर तांदळात सोनकिडे असतील तर तांदूळ काही वेळेसाठी उन्हात ठेवा. असे केल्याने किडे आणि त्याचे अंडी नष्ट होतात. जर तुम्हाला तांदळाला बरेच दिवस साठवायचे असेल तर ती जास्त वेळ उन्हात ठेवू नका.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Tips to protect rice in rain season from insects in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं