Health First | टॉक्सिक शॉक सिंड्रोम | महिलांच्या आरोग्याला ठरतोय घातक | लक्षणे जाणून घ्या

मुंबई, १८ ऑगस्ट | टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा मानवी शरीरासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारा रोग आहे. हा रोग स्टायफिलोकोकस ऑरियस किंवा स्टाफ नावाच्या सूक्ष्मजंतूचे प्रमाण खूप वाढल्यानंतर होतो. हे सूक्ष्मजंतू महिलांच्याच शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. टॉक्सिक शॉक सिंड्रोम सर्वसाधारणपणे पीरियड्सच्या वेळेस अर्थात मासिक पाळीच्या वेळेस महिलांना अधिक त्रास देतो. ज्या महिला टॅम्पोन वापरतात, त्यांना या रोगाचा अधिक त्रास होत असल्याचे आतापर्यंतच्या पाहणीत आढळले आहे.
रक्तदाब वेगाने कमी होतो:
टॉक्सिक शॉक सिंड्रोममध्ये रक्तदाब वेगाने कमी होताना दिसतो. त्यामुळे शरारीत ऑक्सिजन योग्यरिता पोहोचत नाही. परिणामी मृत्यूचा धोका ओढवू शकतो. अमेरिकेतील 24 वर्षांची मॉडेल लॉरेन वासेर हिला 2012 मध्ये हा गंभीर स्वरूपाचा आजार झाला होता. लॉरेनच्या शरीरात विषारी पदार्थ इतके जास्त झाले होते की त्यामुळे ती तिचे पायसुद्धा उचलू शकत नव्हती. शेवटी डॉक्टरांना तिचा पाय कापावा लागला होता.
टॉक्सिक शॉक सिंड्रोमला मेन्स्ट्रुअल स्पॉन्ज, डायाफ्राम आणि सर्व्हायकल कॅपलादेखील जोडले गेले आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांना टॉक्सिक शॉक होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार त्या पुरुष आणि महिलांना होण्याचा धोका असतो, ज्या व्यक्ती सर्जरी किंवा नकली उपकरणांच्या वापरादरम्यान स्टेफ बॅक्टीरियाशी संपर्कात येतात.
19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणींना अधिक धोका:
टॉक्सिक शॉक हा गंभीर आजार होण्याचे एका तृतीयांशपेक्षा अधिक प्रमाण हे 19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणींमध्ये आहे. हा आजार 30 टक्के महिलांना दोनदा होण्याचा धोका असतो. या आजारामुळे हृदय बंद पडू शकते, फुफुससुद्धा निकामी पडू शकते. म्हणजेच काय तर हा आजार थेट हृदयावर आघात करून आपला जीव घेऊ शकतो. त्यामुळे महिलांनी टॉक्सिक शॉकचा त्रास होत असेल तर अजिबात हयगय करता कामा नये. अशा महिलांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
टॉक्सिक शॉकची लक्षणे:
* मानवी शरीरासाठी अधिक घातक असलेल्या टॉक्सिक शॉकची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे.
* अचानक ताप येणे
* ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब कमी होणे
* डायरिया
* हात आणि पायाच्या तळव्यावर ओरखडे पडणे
* भ्रम स्थिती होणे
* अंगदुखी
* तोंड आणि डोळे लाल होणे
जेव्हा महिला मासिक पाळीच्या वेळी टॅम्पोनचा वापर करतात. त्यावेळी जर अधिक प्रमाणात ताप आला, तर महिलांनी तातडीने डॉक्टरांकडे जायला हवे. अशा महिलांना टॉक्सिक शॉकचा त्रास सुरु झालेला असू शकतो. सर्वसाधारणपणे या आजारावर अँटिबायोटिक्स औषधे दिली जातात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Title: Toxic shock syndrome harmful for women health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं