November Grah 2024 | नोव्हेंबर महिन्यात होणार अनेक ग्रहांचे गोचर, 'या' राशींच्या लोकांसाठी धनलाभाचा काळ - Marathi News

November Grah 2024 | ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही महिन्यानंतर ठराविक ग्रहांचे गोचर होत असते. गोचर म्हणजे ग्रह आपली स्थाने बदलतात. ग्रहांनी स्थान बदलली की, त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर पाहायला मिळतो. नोव्हेंबर महिन्यात आणि दिवाळीच्या मुहूर्तावर देखील अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे. तर, कोणत्या ग्रहाचे गोचर कोण कोणत्या राशींसाठी लाभदायी आहे हे आज आपण पाहून घेऊ.
दहा दिवसांनी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान शनीदेव बरोबर 15 नोव्हेंबर रोजी कुंभ राशीमध्ये स्थानापन्न होणार आहे. सोबतच सूर्य, शुक्र आणि बुध हे ग्रह नोव्हेंबर महिन्यात बदलणार आहेत. एवढंच नाही तर चंद्र देखील आपली राशी दर अडीच दिवसांनी बदलत असतो. त्यामुळे कुठेतरी चंद्राचा संयोग असलेला देखील पाहायला मिळणार आहे.
शुक्र गोचर :
नोव्हेंबर महिन्यात शुक्र गोचर होणार आहे. यामध्ये अनेक राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायांमध्ये सोबतच व्यापारकर्त्यांना नोव्हेंबर महिना अत्यंत लाभदायी ठरणार आहे. यामध्ये मेष, मिथुन, वृषभ, कर्क, कन्या, आणि धनु राशीच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
शनि मार्गी :
पंचांगाप्रमाणे 15 नोव्हेंबर रोजी शनि मार्गी होणार असून अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. यामध्ये मेष, मिथुन, कन्या, तूळ या राशींचा समावेश आहे.
सूर्य गोचर :
सूर्य हा ग्रह अनेकांचा मूळ ग्रह असतो. प्रत्येकाच्या स्वभावानुसार देखील ग्रह आणि राशींचे गणित ठरत असते. सूर्याचे गोचर झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये वृश्चिक, मेष, कुंभ, मीन आणि सिंह या राशींना प्रचंड लाभ होणार आहे. यामध्ये सर्वात जास्त बरकत वृश्चिक राशीला होणार आहे. कारण की 16 नोव्हेंबरला सूर्यग्रह वृश्चिक राशीत बसणार आहे आणि 15 डिसेंबरपर्यंत वृश्चिक ग्रहातच बसून राहणार आहे.
Latest Marathi News | November Grah 2024 23 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं