केसरकरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंसोबत भगवी लाट | कोकण दौऱ्यात प्रचंड गर्दी आणि समर्थन मिळतंय

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तरुण, महिला ते ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे म्हणाले रात्रभर याचा विचार मनात येतो. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. आम्ही डोळे बंद करून मिठी मारली पण पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा मग बघू सत्य जिंकते की सत्ता जिंकते, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं नाव न आव्हान दिले. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. आज सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती प्रहार केला.
गद्दारांच्या सरकारने स्थगिती दिली :
‘चिपी विमानतळाचे काम आपण केले आहे. आता श्रेयवादासाठी आणि श्रेय घेण्यासाठी इकडून तिकडून कुणी तरी पुढे आले आहे. आपण कोकणासाठी अनेक काम केले निधी मंजूर केला. पण, त्या कामांना या बेकायदेशीर आणि गद्दारांच्या सरकारने स्थगिती दिली. पण, हे सरकार एक दीड महिन्यात कोसळणार आहे, हे लिहून घ्या, महाराष्ट्र अशी गद्दारी कधीच खपवून घेणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
आज शिवसेनेच्या ‘शिवसंवाद’ यात्रेची सुरुवात कोकणातील कुडाळ येथून झाली. येथे उपस्थित शिवसैनिकांसोबत संवाद साधला. pic.twitter.com/K9Mb0PisfV
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 1, 2022
मुंबईची ओळख पुसण्याचे काम :
राज्यपालांनी मुंबईची ओळख पुसण्याचे काम केले आहे. मुंबई आणि ठाणे निवडणुका आहेत म्हणून राज्यपालांनी नावे घेतली. कोणत्याही समाजामध्ये भांडण नाही. लोकांमध्ये वाद नाही. पण त्यांच्यामध्ये वाद निर्माण केल्याचे काम केले जात आहे. सगळे चांगले सुरू असताना तुकडे पाडणारी लोक आली आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्यपालांवर टीका केली.
सावंतवाडी येथेही शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. कोकणवासियांनी नेहमीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना, शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘रडायचं नाही लढायचं’ आपण लढणार आणि जिंकणारच, असा विश्वास दिला. pic.twitter.com/ihYiGSuQgg
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 1, 2022
ठाकरे परिवार समोर उभा आहे :
ठाकरे परिवार समोर उभा आहे, संपू शकत नाही. महाराष्ट्राला संपवण्याचे राजकारण सुरू आहे, त्याला 40 निर्लज्ज गद्दार फसले. माझ्या मनात यांच्या बदल राग नाही. पण जे सोडून गेलेत त्यांच्या मनात द्वेष आहे हे दिसून येत आहे. आम्ही त्यांना सर्व दिले, वैयक्तिक पदं दिली, मंत्रिपदं दिली, सगळं काही दिलं. पण आमच्या पाठीत का खंजीर का खुपसला हा प्रश्न आजही मनात आहे. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. गरजेपेक्षा जास्त दिले याचे अपचन झाले आहे याचा राग असेल म्हणून पक्ष फोडत आहेत. तुम्हाला जायचे आहे तर जा दडपणे दूर करून खुश राहा. लाज असेल तर राजीनामा द्यावा आणि निवडून या, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Aaditya Thackeray on Konkan Tour check details 01 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं