BJP BMC Politics | ED ने कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही, मग हेडलाईन मॅनेजमेंट करतंय कोण? माध्यमांकडे व्हाट्सअँप PR?

BJP BMC Politics | मुंबई महानगपालिकेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत. स्वतः मोदी-शहा यांना मुंबई महानगरपालिका काही करून हवी आहे. जिथे आर्थिक शक्ती तिथे मोदी शहा नेहमी आग्रही असतात हे सातत्याने पाहायला मिळालं आहे. त्याच अनुषंगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांना ED धाडीतून लक्ष करण्यात येतं आहे. महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांसाठी कोणतही काम उरलं नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना केवळ ED च्या अधिकाऱ्यांना धाड टाकण्यासाठी संरक्षण देणं हेच काम उरल्याचं पाहायला मिळतंय. सर्व चौकश्या केवळ ED कडे देण्याचा सपाटा लावला आहे.
विशेष म्हणजे या धाडीबद्दल अधिकृत माहिती ED त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देतं. मात्र मुंबईतील धाडीबाबत नेमकं काय सापडलं आणि काय माहिती हाती लागली याची कोणतीही अधिकृत माहिती ED ने २१ जून पासून प्रसिद्ध केलेली नसताना कोणत्याही आकडेवारीनुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाच्या बदनामीचा PR चालवला जातोय का अशी शंका येऊ लागली. कोण माध्यमांकडे ही माहिती देतंय जी ED ने सुद्धा जाहीर केलेली नाही. ईडीचे अधिकृत ट्विटर हॅण्डल तुम्ही तेथे तपासू शकता – येथे क्लिक करा
मुंबईत सध्या कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीचे धाडसत्र सुरु आहे. बुधवारी 21 जूनला ईडीने 15 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर आयएएस अधिकारी संजीय जयस्वाल यांना समन्स बजावला होता. आज त्यांची चौकशीही झाली. या दरम्यान बुधवारी टाकलेल्या छापेमारीत ईडीला 150 कोटींची स्थावर मालमत्ता सापडली आहे. या 150 पैकी 100 कोटींची मालमत्ता ही आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या नावावर असल्याचा दावा आता केला जात आहे. विशेष म्हणजे कथित कोविड सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महापालिकेत अतिरीक्त महापालिका आयुक्त होते. त्यामुळे आता खरंच ही संपत्ती संजीव जयस्वाल यांची आहे का?
ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी एवढा मोठा घोटाळा करू शकतील का? त्यात काही सत्य आहे का? याबाबतही अधिकृत सत्य समोर नसताना प्रसार माध्यम ही आकडेवारी कुठून आणत आहेत हेच आता संशयाच्या भोवऱ्यात आलं आहे आणि त्याची समाज माध्यमांवर चर्चा सुरु झाली आहे.
News Title : BJP BMC Politics through ED in focus check details on 24 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं