Brand Rahul Gandhi | सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत राहुल गांधी वेगाने पुढे सरकत आहेत, सर्व्हेतील आकडेवारी मोदींची चिंता वाढवणार
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- २७ टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या बाजूने मतदान
- एनडीटीव्ही सर्वेक्षण
- पीएम पदासाठी प्रश्न
- मोदींना कोण आव्हान देऊ शकतं?
- राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ची लोकप्रियता वाढली

Brand Rahul Gandhi | कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले असले तरी राहुल गांधी वेगाने त्यांचा पाठलाग करत असल्याचं आकडेवारीत दिसतंय. विशेष म्हणजे हा सर्व्हे गौतम अदाणींच्या मालकीच्या टीव्ही वृत्त वाहिनेने केल्याने त्यात साहजिक मोदींचं वजन वाढणार आहे. पण याच सर्व्हेत राहुल गांधी यांच्या बाबतीत पुढे आलेली आकडेवारी वास्तवात अधिक असणार असा अंदाज देखील समाज माध्यमांवर बांधला जातोय.
२७ टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या बाजूने मतदान
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 43 टक्के लोक म्हणत आहेत की पंतप्रधान पदासाठी मोदी ही पहिली पसंती आहे. मात्र, २७ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बाजूने मतदान केल्याने भाजपाची या आकड्याच्या उसळीने चिंता वाढली आहे. कारण २०२४ पर्यंत ते अजून पुढे जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या शर्यतीत विरोधकांची एकजूट साधण्यात मग्न असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना सर्वेक्षणातील केवळ १ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
एनडीटीव्ही सर्वेक्षण
लोकनीती सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) आणि एनडीटीव्ही यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, ४३ टक्के लोकांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तिसऱ्यांदा निवडून यावी असे म्हटले आहे. मात्र, तब्बल ३८ टक्के लोक एनडीए विरोधात आहेत. आज निवडणूक झाल्यास ४० टक्के लोक भाजपला मतदान करण्यास तयार आहेत.
मात्र, काँग्रेसच्या बाबतीत हा आकडा २९ टक्केवर पोहोचला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २९ टक्के लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याच्या बाजूने कौल दिला आहे. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 19 टक्के मते मिळाली होती. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस अजून वेगाने पुढे जाईल असा अंदाज वर्तविण्यात येतं आहे.
पीएम पदासाठी प्रश्न
10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, 43 टक्के लोकांचे म्हणणे आहे की पंतप्रधान पदासाठी मोदी ही पहिली पसंती आहे. मात्र, २७ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या बाजूने मतदान केले. विशेष म्हणजे या शर्यतीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल फक्त 4 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर होते. मागील सर्व्हेत केवळ ५-६ टक्क्यांवर दिसणारे राहुल गांधी थेट २७ टक्क्यांवर पोहोचल्याने भाजपाची चिंता वाढली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना ३ टक्के लोकांनी पसंती दिली. सीएम नीतीश कुमार यांच्या बाबतीत हा आकडा केवळ 1 टक्के आहे.
मोदींना कोण आव्हान देऊ शकतं?
सर्वेक्षणानुसार, 34 टक्के लोकांना असे वाटते की राहुल गांधी पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतात. अरविंद केजरीवाल (११ टक्के), अखिलेश यादव (५ टक्के) आणि ममता बॅनर्जी (४ टक्के) यांना प्रथम पसंती होती.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ची लोकप्रियता वाढली
२६ टक्के लोकांनी राहुलला नेहमीच पसंती दिली. मात्र, १५ टक्के लोकांनी ‘भारत जोडो यात्रे’नंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आवडू लागल्याचे सांगितले.
News Title: Brand Rahul Gandhi in survey check details on 24 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं