सकाळच्या भोंग्यावरील शिंदेंच्या प्रतिक्रियेवर नेटिझन्सकडून तुफान टीका | तुम्ही गुजराती सोमय्याचा भोंगा घेऊन फिरा अशा तिखट प्रतिक्रिया

CM Eknath Shinde | शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ) अटक करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबद दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी, सकाळी 8 वाजताचा भोंगा बंद झाला,. भोंगा आत गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर सभेला आलेल्या लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रचंड जल्लोष केला. राऊतांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण ईडीच्या हातात आहे. त्यामुळे चौकशीतूनच सत्य बाहेर येईल. कर नाही, त्याला डर कशाला? असं राऊत म्हणत होते. त्यामुळे त्यांनी घाबरू नये, असा चिमटाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला.
आपल्याच समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्याला जनता समजू लागले ?
मुखमंत्री शिंदे सध्या आपल्याच समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्याला जनता समजू लागले आहेत असच म्हणावं लागेल. वास्तविक गर्दी जमवून राज्यातील जनता आपल्यासोबत असल्याचा ते भास निर्माण करत आहेत. त्यासाठी ४० समर्थकांपैकी सोयीच्या मतदारसंघात ते सभा आयोजित करत आहेत. ते सिल्लोडमध्ये म्हणाले, आम्ही जी काय भूमिका स्वीकारली ती बाळासाहेबांच्या विचारातूनच स्वीकारली आहे. बाळासाहेबांचा अजेडा पुढे घेऊन जात आहोत. तो लोकांनी स्वीकारला आहे. म्हणूनच एवढा मोठया प्रमाणावर जनतेचा प्रतिसाद मिळतोय, असं त्यांनी सांगितलं.
समाज माध्यमांवर शिंदेंच्या वक्तव्यावर चौफेर टीका :
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर समाज माधयमांवर तुफान टीका सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यातील काही प्रतिक्रिया या अशा आहेत ज्यामध्ये अनेकांनी म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री पदी बसूनही तुम्ही अजून ठाण्याचे स्थानिक नेतेच आहात हे स्वतःच्या वक्तव्यातून सिद्ध करताय. तसेच अनेकांनी तुम्ही भाजपचे भोंगे उचला असं सांगताना किरीट सोमैयांच्या रोजच्या सकाळच्या भोंग्याची आठवण करून दिली आहे. तसेच ते रोज सकाळी भाजपवर तुटून पडायचे, पण शिवसेनेच्या नेत्यांवर तेव्हा आरोप होत असताना राऊत प्रतिउत्तर देत होते, पण तुम्ही आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी भाजपच्या संपर्कात होता असं अनेकांनी म्हणाले आहे. रोज सकाळी सोडा तुम्ही कधीच शिवसेना नेत्यांवरील आरोपांवर समोर येऊन भिडला नाहीत हे वास्तव देखील अनेकांनी लक्षात आणून दिलं आहे.
हा TV९ मराठीचा व्हिडिओ पहा आणि त्यावरील प्रक्रिया पहा, तुम्हाला सामान्यांच्या विचाराचा कानोसा घेता येईल. (Video Credit TV9 Marathi)
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: CM Ekanth Shinde statement after MP Sanjay Raut arrested check details 01 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं