बंडखोर आमदारांना सामान्य जनतेचं समर्थन असं सांगत, लोकांची भूमिका सुद्धा शिंदेंनी स्वतःच जाहीर केली
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दोऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याविषयी माहिती दिली. “सर्व 12 खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्र दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करुन १२ लोकांचं पत्र दिलेलं आहे. दिल्लीत येण्याचं हे एक कारण होतं. तर दुसरं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणासाठी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्याच सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो होतो. हे दोन विषय महत्त्वाचे असल्यामुळे मी दिल्लीत आलो होतो. मी सर्व बारा खासदारांचं मनापासून स्वागत करतो”, असं एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.
महाराष्ट्राच्या जनतेने आमचं समर्थन केल्याचं स्वतःच जाहीर केलं :
शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते राहुल शेवाळे, मुख्य प्रतोद भावना गवळी, खासदार सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, श्रीकांत शिंदे यांचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं. दरम्यान, “शिवसेनेच्या ५० आमदारांना जी भूमिका घेतली त्याचे स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने केले आहे. जनतेने निवडणुकीपूर्वी अडीच वर्षांपूर्वी जी युती होती त्याचे स्वागत केले आहे. लोकांसाठी जे चागले काम करता येईल, असं लोकांचं सरकार असावं, अशी आमची भूमिका आहे”, असं एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले.
आमच्यासोबत आले त्याचं मी स्वागत :
आम्ही ५० आमदारांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेने केल्याचं ते म्हटले. निवडणुकीच्या आधी आम्ही युती म्हणून लढलो होतो. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात जनतेचं सरकार स्थापन केलं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच १२ खासदारांनी आज जी भूमिका घेतली आणि ते आमच्यासोबत आले त्याचं मी स्वागत करतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: CM Eknath Shinde press conference in Delhi check details 19 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं