ED अधिकारी मुंबई पोलिसांच्या चौकशी फेऱ्यात अडकण्याच्या धास्तीने फडणवीसांची CBI मार्गे नवी राजकीय खेळी?

मुंबई, 09 मार्च | शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याची पोलखोल करणार असल्याचं म्हटलं होतं. ईडीचा तो अधिकारी कोण अशी चर्चाही त्यांच्या फेब्रुवारीमधील पत्रकार परिषदेपासून सुरू होती. अखेर आज संजय राऊत यांनी ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव घेत गंभीर आरोप केले. खंडणी वसुली करुन परदेशात बेनामी संपत्ती खरेदी केली जात आहे. ईडीच्या खंडणी रॅकेटच्या एजंटमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही असल्याचा दावा राऊत यांनी केला.
चार ईडी अधिकाऱ्यांसह नौलानीबाबत तक्रार मुंबई पोलिसात तक्रार :
मुंबई पोलिसांत एक तक्रार आम्ही दाखल करतोय. या ‘एफआयआर’नुसार मुंबई पोलीस आयुक्तांना भ्रष्टाचाराबाबत, खंडणीबाबत तक्रार देतोय. चार ईडी अधिकाऱ्यांसह नौलानीबाबत आम्ही तक्रार करतोय. मुंबई पोलीस आजपासून याची चौकशी करत आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की, मुंबई पोलीस याप्रकरणाची आजपासून चौकशी सुरू करत आहेत असं राऊत पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले.
राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांची नवी राजकीय CBI खेळी ?
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या संबंधित प्रकरणात भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांना मदत केल्याचा आरोप फडणवीसांनी विधानसभेत केला आहे.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ आणि पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. आपल्याकडे सव्वाशे तासांचे व्हिडीओ रेकॉर्डींग आहे. यातील काही व्हिडीओ सभागृहात दाखवले तर इभ्रत जाईल. या व्हिडीओच्या माध्यमातून २० ते २५ वेब सिरीज होतील असाही टोला फडणवीसांनी सभागृहात लगावला.
भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर २०१८ सालच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील एका वादाप्रकरणी पुणे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केला. या प्रकरणात मोक्का लावण्यात यावा अशी कागदपत्र तयार केली. ही सर्व कारवाई विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं ठिकाण आहे. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत आहे”, असं सांगून सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप फडणवीस यांनी केले आहेत.
या संभाषणात भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी प्लानिंग झाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. ज्यात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचंही या व्हिडीओत स्पष्ट होत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. साक्षीदार तयार करण्यापासून ते FIR पोलिसांना बनवून देण्यापर्यंत प्रवीण चव्हाण यांनी या प्रकरणात भूमिका बजावली. यासाठी मुंबईतील एका हॉटेलमध्ये सरकारमधील एका मंत्र्यासोबत बैठकही झाल्याचा आरोप फडणवीसांनी सभागृहात केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
सीबीआय चौकशीची मागणी :
राजकारणात आम्ही विरोधक आहोत, शत्रू नाही. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी मान्य झाली नाही तर कोर्टात जाण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे सत्तापक्षातील नेते आता या आरोपांवर काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Devendra Fadnavis stand in house over MahaVikas Aghadi government.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं