शिंदे गटातील अनेकांच्या प्रॉपर्टी ईडीकडून सील, आता उद्धव ठाकरेंना सांगतात, तुमचे जन्मदाते वडील तुमची प्रॉपर्टी नाही

Uddhav Thackeray | मी मुख्यमंत्री असताना माझ्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्या. एकदा नाही दोनदा झाली. एका सकाळी मला जाणवलं की मला हालचालच करता येत नाहीये. त्यावेळी माझी जी काही अवस्था झाली तो वेगळाच अनुभव होता. मी आजारपणातून उठूच नये म्हणून काही लोक देव पाण्यात बुडवून बसले होते तेच आज पक्ष बुडवायला निघाले आहेत अशी टीका करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना फटकारलं आहे.
‘सामना’ चे संपादक खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. शिवसेनेचा बाप, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशिवाय निवडून येण्याचं आव्हान दिलं आहे. तसेच शिवसेनेतून गेलेल्यांना पालापाचोळा असा शब्दोल्लेख केला आहे. याला औरंगाबादचे शिंदे गटात गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिउत्तर दिलंय.
प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले :
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, शिवसेना प्रमुखांची उंची तुम्ही कमी करू नका. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही घडलोत. त्यांना तुम्ही एवढं छोटं कमी करण्याचा का प्रयत्न करताय? राजकारण करायचं तर स्वतःचा ठसा उमटवा. आजही पहिलं नाव छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता. त्या दर्जात उच्च पदाला गेलेला हा माणूस आहे. त्याला खाली खेचायचं काम करू नका. शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ती प्रत्येक शिवसैनिकाचं दैवत आहे. त्यांचा उल्लेख पुन्हा असा करू नका. त्यांना खुजं करू नका.
या गळालेल्या पालापाचोळ्याचं खतही तयार होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे आमच्यासाठी खूप मोठे आहे. त्यांच्या पुणाईमुळे आम्ही आमदार, खासदार झालो आहोत. तुम्हाला राजकारण करायचे आहे तर बाळासाहेबांचं वापर कशाला करता. एका दर्जेवर गेलेला मोठा नेत्याला खाली खेचू नका. बाळासाहेबांनी कधी शिवाजी महाराजांना नमस्कार केल्याशिवाय सभा सुरू केली नाही. शिवसेनाप्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही. हे प्रत्येक शिवसैनिकाचे दैवत्त आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, बाळासाहेबांना खुजे करू नका, असं शिरसाट म्हणाले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Eknath Shinde Rebel against Shivsena check details 26 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं