कळमनुरीतील राजकीय अ'संतोष विरोधात फिल्डिंग | माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Former MLA Santosh Tarfe | हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे आणि शेतकरी नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजित मगर हे आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांनी शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या नैत्रुत्वात लढणार असल्याचं म्हटलं आहे.
कडवी फाईट मिळणार :
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आधी मी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार असल्याच्या शपथा संतोष बांगर यांनी घेतल्या होत्या. मात्र शिंदे यांच्या बहुमत चाचणीला ऐनवेळी आपण शिंदे गटात शामिल होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने मतदानही केले. त्यामुळे बांगर यांचा हा शिंदेगटातील प्रवेश शिवसेनेला जिव्हारी लागलेला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी बांगर यांनी मोठी रॅलीही काढली होती. आता शिवसेनेने त्यांना कडवी फाईट देण्याचं ठरवलेलं दिसतंय.
माजी आमदार टारफे यांच्या सोबत शेतकरी नेते अजित मगर यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश केला. अजित मगर ह्याना 2019 च्या निवडणूकित विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी पराभूत केले होते. अजित मगर हे वंचित बहुजन आघाडी च्या तिकिटावर निवडणूक लढले होते. माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला नंतर येणाऱ्या काळात विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Former MLA Santosh Tarfe join Shivsena Party in presence of Uddhav Thackeray check details 29 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं