हरयाणात भाजपच्या अडचणीत वाढ, सर्व धर्मीय लोकांसहित तब्बल 34 शेतकरी संघटनांचा मोर्चा, मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगीच्या अटकेची मागणी

Arrest Monu Manesar and Bittu Bajrangi | भाजपाची सत्ता असलेल्या हरयाणातील नूंह मधील हिंसाचारातील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोनू मानेसरच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. बुधवारी हिसारमध्ये हरियाणातील तब्बल 30 खाप, संयुक्त किसान मोर्चाचे नेते, शेतकरी संघटना आणि विविध धर्माच्या लोकांची महापंचायत पार पडली. यामध्ये नूह हिंसाचारासंदर्भात अनेक ठराव मंजूर करण्यात आले.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते सुरेश कोठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महापंचायतीत हिसार, जींद, कैथर, करनाल, भिवानी आणि फतेहाबाद या जिल्ह्यांतील लोक सहभागी झाले होते. महापंचायतीमध्ये नूहमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्यात आली आणि प्रक्षोभक घोषणा आणि भाषणे करणाऱ्यांना इशारा देण्यात आला.
मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगीला अटक करण्याच्या मागणी
स्वयंघोषित गोरक्षक मोनू मानेसर आणि बिट्टू बजरंगी यांना अटक करण्याच्या मागणीसह अनेक ठराव महापंचायतीत एकमताने मंजूर करण्यात आले. मोनू आणि बजरंगी यांनी ब्रजमंडल यात्रेत सहभागी होण्याची घोषणा करताना मुस्लिम समाजाला आव्हान दिले होते आणि अपशब्द वापरले होते, असा आरोप आहे.
दरम्यान, हिंसाचारानंतर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी मोनू मानेसरची भूमिका फेटाळून लावली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा शांततेत सुरू असून अचानक त्यावर हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी मोनू मानेसरच्या भूमिकेची चौकशी केली जाईल, असे सांगितले होते. यावर्षी फेब्रुवारीमहिन्यात राजस्थानमधील भरतपूर येथील रहिवासी नासिर आणि जुनैद या जनावरांचे व्यापारी गोतस्करीच्या संशयावरून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मोनू मानसेर यांचे नाव समोर आल्याने मुस्लिम समाजात त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत होता अशी राजकीय बोंबाबोंब सुरु केली होती.
सर्व धर्मांच्या लोकांना आवाहन
भविष्यात हिंसाचार झाल्यास सर्व धर्मांच्या लोकांनी स्वत:ला दूर ठेवावे, असा ठरावही खाप व शेतकरी महापंचायतीत मंजूर करण्यात आला. नूंह मधील हिंसाचारानंतर समाजातील प्रत्येक घटकाने शांतता, सलोखा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सोशल मीडियावर प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी.
लोकांना धमकावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी
अफवा पसरवणाऱ्या आणि लोकांना धमकावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. संयुक्त किसान मोर्चाचे नेते कोथ यांनी भाजपशी संबंधित लोक दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. शेतकरी संघटना वातावरण बिघडू देणार नाही, असे ते म्हणाले. भाजपशी संबंधित संघटना मिरवणुका काढून सरपंचांना मुस्लिमांना गाव सोडण्याचे आदेश देण्यास भाग पाडत आहेत. समाजातील सलोखा बिघडवणाऱ्या अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची आमची मागणी आहे.
News Title : Haryana Arrest Monu Manesar and Bittu Bajrangi check details on 11 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं