INDIA Vs NDA | अजब दावा! 'इंडिया' या नावामुळे हिंसा होऊ शकते, विरोधकांच्या आघाडीविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

INDIA Vs NDA | इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूसिव्ह अलायन्स (INDIA) या नावाच्या संक्षिप्त स्वरूपाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात देशातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा अजब दावा याचिकाकर्त्याने याचिकेत केला आहे. निवडणूक आयोगाकडून (ईसीआय) उत्तर न मिळाल्याने याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतल्याचे समजते. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सदर याचिकाकर्ता भाजप पुरस्कृत असावा याची देखील त्यानंतर चर्चा रंगलेली असताना दुसऱ्या बाजूला भाजपने किती राजकीय धास्ती घेतली आहे याची देखील चर्चा सुरु झाली आहे.
राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय आघाडीसाठी ‘इंडिया’ हे नाव वापरू नये, यासाठी निवडणूक आयोगाने आजतागायत कोणतीही कारवाई केलेली नाही. अशा परिस्थितीत याचिकाकर्त्याला ही रिट याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय उरत नाही. १९ जुलै रोजी त्यांनी आपले मत निवडणूक आयोगाला कळवले होते.
I.N.D.I.A या नावाच्या वापरावर बंदी घालण्याची विनंती
मुख्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती संजीव नरूला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेद्वारे I.N.D.I.A या नावाच्या वापरावर बंदी घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारकडून योग्य ती पावले उचलण्याची मागणीही करण्यात आली आहे. पक्षांनी नाहक फायदा घेण्यासाठी या आघाडीचे नाव घेतल्याचे याचिकेत म्हटले आहे.
याचिकेत नेमकं काय आहे?
शॉर्ट फॉर्म इंडिया हे नाव राजकीय पक्षांनी केवळ सहानुभूती आणि मते मिळवण्यासाठी वापरले आहे, असे याचिकेत म्हटले आहे. याचा वापर राजकीय फायद्यासाठी आणि ठिणग्या पेटवण्याचे साधन म्हणून केला जात आहे, ज्यामुळे पुढे राजकीय द्वेष आणि नंतर राजकीय हिंसाचार होऊ शकतो, असेही म्हटले गेले.
याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की शॉर्ट फॉर्म इंडिया हा राष्ट्रीय चिन्हाचा भाग आहे आणि त्याचा राजकीय वापर केला जाऊ शकत नाही. याचिकेनुसार, “… या राजकीय पक्षांच्या या स्वार्थी कृतीमुळे आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष मतदानावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे नागरिकांना नाहक हिंसाचाराला सामोरे जावे लागू शकते.
News Title : INDIA Vs NDA Delhi High Court check details on 04 August 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं