Loksabha Election | लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे प्रचंड मार्केटिंग होणार, डिफेन्स डील मुद्द्याचा स्वतःच्या प्रचारासाठी वापर करणार?

Loksabha Election | भारतात लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. तसेच मागील १० वर्षात महागाई आणि बेरोजगारीची रुद्र रूप धारण केल्याने मोदी सरकारची चिंता वाढली असून, सामान्य लोकं सुद्धा भाजपवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे संधी मिळेल तिथे स्वतःचा जयजयकार कसा होईल याची आखणी मोदी सरकार करत आहे.
दरम्यान, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्याच दौऱ्याचं प्रचंड मार्केटिंग करायचं अशी योजना भाजप आखात आहे अशी खात्रीलायक माहिती आहे. सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था सुद्धा मंदीच्या अडचणीतून जातं असल्याने त्यांना देखील पैशाची प्रचंड गरज आहे. त्यामुळे अमेरिकन शस्त्रास्त्र भारताला विकून अरबो रुपये स्वतःकडे खेचायचे याची संधी अमेरिका सुद्धा सोडणार नाही याची जाणीव पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यात येतील तेव्हा इव्हेन्ट घडवून आणायचा यासाठी अमेरिकेतील यंत्रणांची भारताच्या प्रतिनिधींसोबत चर्चा सुरु असल्याचं वृत्त आहे.
अमेरिकेत सुद्धा लवकरच निवडणुका होणार आहेत, त्यामुळे अमेरिकेतील जो बायडन यांचे भारतीय समर्थक कामाला लागले आहेत. दरम्यान, भारताने अमेरिकेसोबत संरक्षण करार केला असून, त्याअंतर्गत भारताला एमक्यू-9 बी प्रीडेटर ड्रोन मिळणार आहेत. या ड्रोनची खासियत म्हणजे ते टार्गेट सेट करून मारतात. त्यांची पाळत ठेवणारी यंत्रणा जगातील सर्वोत्तम मानली जाते. अमेरिकेने काबूलमधील अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीयाला ठार मारण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केला होता.
याशिवाय इराणचा लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यालाही अमेरिकेने या ड्रोनच्या माध्यमातून इराकमध्ये ठार केले होते. या ड्रोनच्या माध्यमातून सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवणे अत्यंत सोपे होणार आहे. हे ड्रोन कोणत्याही हवामानात ३० तासांपर्यंत सतत उड्डाण करू शकतात. भारत सरकार जनरल अॅटॉमिक्स या अमेरिकन कंपनीकडून ते विकत घेत आहे. नागरी हवाई क्षेत्र, संयुक्त दलाची कारवाई आणि सागरी क्षेत्रात एकाच वेगाने उड्डाण करण्यास सक्षम आणि शत्रूवर हल्ला करू शकणारे हे ड्रोन असल्याचे कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
मोदींच्या या दौऱ्यात ‘गोदी मीडिया’ या ड्रोनची खासियत सांगताना आता पाकिस्तान आणि अमेरिकेची खैर नाही असे इव्हेन्ट स्टुडिओत बसून घडवून आणतील. हिंदू-मुस्लिम वादासोबत मोदींच्या प्रचारात पाकिस्तान-चीन आणि भारतीय लष्कराला ‘गोदी-मीडिया’ केंद्रस्थानी ठेऊन स्टुडिओतून लोकसभा निवडणुकीसाठी मोदींचा प्रचार करतील.
भारताव्यतिरिक्त क्वाड देशांमध्ये समाविष्ट असलेल्या जपान आणि ऑस्ट्रेलियाकडेही हे ड्रोन आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून नौदलाला मोठी ताकद मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सागरी क्षेत्रातील शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यास त्याला मदत होईल. याशिवाय गरजेच्या वेळी युद्धकार्यातही त्यांचा वापर होऊ शकतो.
सैन्यदलाला मिळणार एकूण ३० ड्रोन, हवाई दलाला ८
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने एकूण ३० ड्रोनचा करार केला आहे. यातील १४ ड्रोन नौदलाला, तर ८-८ ड्रोन लष्कर आणि हवाई दलाला मिळणार आहेत. या ड्रोनचा वापर करून अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानातील शत्रूचे १६ तळ २३० किलो स्फोटकांनी उद्ध्वस्त केले. या ड्रोनचे सी गार्डियन आणि स्काय गार्डियन असे दोन प्रकार आहेत.
News Title : Loksabha Election 2023 check details on 17 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं