राज्यात भाजपचं लोकसभा मिशन 48 | शिंदे गट भाजपात विलीन होणार किंवा राजकीय विश्वासघात होणार? | दानवेंच्या विधानाने खळबळ

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. इथून पुढच्या सर्व निवडणुका भाजपसोबत युती करूनच लढणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलंही जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्याती महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाने कुठेही म्हटलेलं नाही :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असून, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं सर्वोच्च न्यायालयाने कुठेही म्हटलेलं नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. त्यामुळेच मी म्हणतोय की, आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. तुम्ही विचार करत आहात, त्याआधी विस्तार करू.
राज्यात भाजपचं मिशन 48 :
मात्र, दुसरीकडे भाजपमधून वेगळेच दावे करण्यात येत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात भाजपचं मिशन 45 नाही तर मिशन 48 असणार आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवर विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजप जर महाराष्ट्रात मिशन 48 राबवणार आहे तर मग शिंदे गटाचं काय? भाजप शिंदे गटाला वाऱ्यावर सोडणार की भाजपच्याच तिकीटावर शिंदे गटाच्या खासदारांना तिकीट देणार असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maharashtra BJP Loksabha Mission 48 said Raosaheb Danve check details 07 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं