राज्यपाल राजभवनात दाखल | शिंदे समर्थकांना मुंबई विमानतळावर जमण्याच्या सुचना | राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येणार

Maharashtra Political Crisis | आज पवारांच्या निवासस्थानी आता मविआच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. शिंदे यांचं बंड थोपवण्यासह पुढे काय करायचं याबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे. गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे यांचं बंड थोपवण्यात पवारांना यश येईल का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजभवनावर दाखल :
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात करून आता राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. गुवाहाटीमधील आमदार येत्या ४८ तासात मुंबईमध्ये परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज रात्री किंवा उद्या रात्री सर्व आमदार मुंबईत दाखल होणार आहे. शिंदे समर्थकांना मुंबई विमानतळावर जमण्याच्या सुचना देण्यात आली आहे. मुंबई विमानतळाला देखील अलर्ट दिला गेला आहे. राज्यपाल आपला विशेषाधिकार वापरुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, शिंदे गटाच्या वकिलांची एक टीम हायकोर्ट आणि एक टीम सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याची तयारी करत आहे.
शिवसैनिक आक्रमक :
उल्हासनगर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचं ऑफिस फोडण्यात आलं. तर तानाजी सावंत यांचंही कार्यालय फोडण्यात आलं. अशात उस्मानाबादमध्येही तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणा बाजी करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी उस्मानाबाद या ठिकाणी संपर्क कार्यालयासमोर शिवसैनिकांनी हल्लाबोल करत आंदोलन केलं. त्यांच्या कार्यालयाला काळं फासलं.
राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येणार :
प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबई विमानतळावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक संतप्त होऊन येथे हजर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारण आहे मुंबई विमानतळ प्रशासनाला आणि मुंबई पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. प्रचंड जनसमुदाय जमान्याचा धास्तीने कदाचित हेलिकॉप्टरने टप्प्या टप्प्याने आमदारांना थेट विमानतळावरूनच राजभवनात घेऊन जाण्यात येऊ शकतं असं देखील म्हटलं जातंय. त्यानंतर विधानभवनात मोठं राजकीय तांडव पाहायला मिळेल असं म्हटलं जातंय. अनेक बंडखोर आमदारांमध्ये त्यानंतर चलबिचल होऊन पुन्हा महाविकास आघाडीत परती होऊ शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Maharashtra Political Crisis after Eknath Shinde rebel check details 26 June 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं