शिंदे गटात जाऊन आमदार संजय शिरसाट यांचा अपमान थांबेना, शिवसेनेचे माजी खासदार खैरेंचा पहिल्यांदा सत्कार

MLA Sanjay Shirsat | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काल औरंगाबादमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेचे नेते पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे यावेळी नेमक्या काय घडामोडी घडणार? कोण-कोणामध्ये शाब्दिक चकमक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच वादाची पहिली ठिणगी पडली ती आमदार संजय शिरसाट आणि थेट पोलिसांमध्येच. यावेळी आमदार शिरसाट यांचा इगो चांगलाच दुखावला, आणि त्याला कारण ठरले शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मिळालेला प्रथम मान.
एका बैठकीचे आयोजन :
औरंगाबाद पोलीस आयुक्तलयाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त संत एकनाथ रंगमंदिरामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार शिरसाट यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदिप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलिस आयुक्त, सहायक आयुक्त असे सर्वजण उपस्थित होते.
शिरसाट यांच्याआधी खैरे यांचे नाव पुकारले :
याचवेळी सहाय्यक आयुक्तांनी सत्कारासाठी आमदार शिरसाट यांच्याआधी चंद्रकांत खैरे यांचे नाव पुकारले. सत्कारासाठी आपल्याआधी खैरे यांचे नाव घेतल्याने शिरसाट यांचा पारा चांगलाच चढल्याचे पाहायला मिळाले. शिरसाट तडकाफडकी जागेवरून उठून निघाले. पण शेजारीच बसलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात पकडत रोखले. शिरसाट रागात म्हणाले, प्रोटोकॉल वगैरे काही आहे की नाही? पण जलिल आणि मंत्री अतुल सावे यांनी त्यांना कसेबसे शांत केले.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: MLA Sanjay Shirsat over protocol issue check details 28 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं