कालच महाराष्ट्रनामाने सांगितलं ते आजच झालं | मेट्रो कारशेड आरेतच | मुंबईच्या पर्यावरणाच्या ऱ्हासाची सुरुवात

Mumbai Aarey Metro Car Shade | महाराष्ट्रात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर जुन्या सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याची कसरत सुरू झाली आहे. गुरुवारी नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर राज्य सरकारने मुंबईच्या आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बांधण्याचे आदेश महाधिवक्त्यांना दिले आहेत. रिपोर्ट्सनुसार, आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड बांधकाम प्रकरणी नव्या सरकारने महाराष्ट्र सरकारला आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी मुंबईत :
राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी मुंबईत बोलावण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना आरेमध्ये कारशेड बांधण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देश दिले.
पर्यावरणवाद्यांचा आणि मुंबईकरांचा आरे येथे कारशेड बांधण्यास विरोध :
29 नोव्हेंबर 2019 रोजी, राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर ठाकरे यांनी आरेमध्ये कारशेड बांधण्याचा फडणवीस यांचा निर्णय रद्द केला. मुंबईतील अनेक पर्यावरणवाद्यांनी आरे येथे कारशेड बांधण्यास विरोध केला. कारण इथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार आहे आणि बिबट्या तसंच इतर प्राण्यांचं निवासस्थान आहे. कारशेडमुळे मुंबईतील मोठ्या हिरवळीचं नुकसान होईल, असा दावा करणाऱ्या पर्यावरणवाद्यांना आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दिला. एमव्हीए सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेचच आरेमधील 804 एकर जमीन राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आली.
कांजूरमार्ग येथील शेडच्या बांधकामाला स्थगिती :
कांजूरमार्ग येथे पर्यायी जागेवर कारशेड बांधण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, डिसेंबर 2020 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील शेडच्या बांधकामाला स्थगिती देऊन ठाकरे सरकारच्या एका सर्वात मोठ्या निर्णयाला स्थगिती दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीसांचा पुन्हा विवादित मुद्याला हात :
दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानचा 33 किमी लांबीचा भुयारी मेट्रो प्रकल्प कांजूरमार्ग भूखंडावरील कायदेशीर वादामुळे रखडला होता, जिथे पूर्वीच्या महाविकास आघाडी (MVA) सरकारने मेट्रो कारशेड बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस यांनी विचारलं की, कारशेड केवळ आरेमध्येच बांधता येईल, असं अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून न्यायालयाला कळवता येईल का? आरे येथून कारशेड स्थलांतरित करण्याचं पाऊल शिवसेना आणि त्यांचा माजी मित्रपक्ष भाजप यांच्यातील वादाचं प्रमुख कारण होतं.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Mumbai Aarey Metro Car Shade check details 01 June 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं