Oppositions Meeting | विरोधकांची बेंगळुरू येथे १३ आणि १४ जुलै रोजी होणारी बैठक पुढे ढकलली, खरं कारण आलं समोर

Oppositions Meeting | भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधी पक्षएकत्र येण्याची दुसरी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे १३ आणि १४ जुलै रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, बैठकीच्या नव्या तारखेबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. पावसाळी अधिवेशनानंतर विरोधकांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. या घडामोडीचा संबंध नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षातील बंडखोरीशी जोडला जातं असला तरी वास्तविक दुसरंच कारण समोर आलं आहे.
कर्नाटकातील बेंगळुरू येथे होणारी पुढील बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर पुढील बैठक होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होऊन २० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या या बैठकीला सुमारे १५ पक्षांचे नेते उपस्थित होते.
मुख्य काय आहे कारण?
बिहार विधानसभेचे १० जुलै ते १४ जुलै दरम्यान होणारे पावसाळी अधिवेशन आणि कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बेंगळुरूयेथे होणारी बैठक पुढे ढकलण्याची विनंती राष्ट्रीय जनता दल आणि जेडीयूने काँग्रेस नेतृत्वाला केल्याचे बोलले जात आहे. पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक पुढे ढकलण्याचे आवाहनही कर्नाटक काँग्रेसने हायकमांडला केल्याचे समजते.
अजित पवारांची बंडखोरी कारणीभूत आहे का?
विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षांची दुसरी बैठक सिमल्याऐवजी १३-१४ जुलै रोजी कर्नाटकच्या राजधानीत होणार असल्याचे जाहीर केले होते. हवामानाचा हवाला देत त्यांनी गुरुवारी ही माहिती दिली होती. आता बेंगळुरूची बैठक पुढे ढकलल्याचा संबंध राष्ट्रवादीतील फुटीशी जोडून पाहिला जाऊ शकतो. शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या शेवटच्या बैठकीलाही हजेरी लावली होती. त्याचबरोबर विरोधकांच्या ऐक्याचे मुख्य नेत्यांपैकी शरद पवार हे एक प्रमुख नेते होते.
News Title : Oppositions Meeting postponed check details on 03 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं