Rahul Gandhi | देशासमोर सत्य मांडणाऱ्या राहुल गांधींची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची सुपरसॉनिक वेगात कारवाई

Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. केरळमधील वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविल्यानंतर ते लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरले आहेत.
‘मोदी आडनावा’बाबत वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्वापासून अपात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला होता.
मात्र, राहुल गांधी यांना अजूनही कोर्टात जाण्याची संधी आहे. सुरत कोर्टाच्या निर्णयाविरोधात ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात. मात्र, तेथून राहुल यांना धक्का बसला तर ते पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत. राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. सत्य बाहेर येईल आणि सुरत कोर्टाने दिलेला निकाल उच्च न्यायालयबदल करेल, असे पक्षाने म्हटले आहे. राहुल गांधी अधिक ताकदीने परततील, असा दावा पक्षाने केला आहे.
राहुल गांधी देशासमोर सत्य मांडत आहेत
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, या कारवाईत सर्वात मोठा गुन्हा कोणता होता? राहुल गांधी देशासमोर सत्य मांडत आहेत आणि ते भाजपला आवडत नाही. त्यामुळे राहुल यांचे सदस्यत्व संपुष्टात आल्याने समस्या संपुष्टात येईल, असे त्यांना वाटते आहे, पण तसे होणार नाही. आम्ही लढा सुरूच ठेवू आणि जेपीसीची मागणी सोडणार नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Rahul Gandhi Lok Sabha membership ended check details on 24 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं