Raj Thackeray | एक बिल्डर म्हणाले, मुंबई बिल्डरच्या घशात टाकलीय | राज ठाकरेंना टोला

मुंबई, 03 एप्रिल | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणात महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान लक्ष्य केलं, तसेच राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचीही नक्कल करत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांना चिमटा काढला.
भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला विशेष लक्ष केल्याचं पाहायला मिळाल. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियाविरोधातील ED कारवाईचे अप्रत्यक्ष समर्थन केले. तसेच राज यांनी उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांना नाव न घेता लक्ष केले आहे. कालच्या भाषणात मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरेंनी मुंबई शहर बिल्डरांच्या (बांधकाम व्यावसायिकांच्या) घशात घालण्याची योजना असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. मात्र या आरोपाला शिवसनेच्या महिला पदाधिकाऱ्याने मोजक्या शब्दात आणि अर्थपूर्ण टोला लगावला आहे. शिवसेना प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी ट्विट करताना म्हटले की, “आज एक बिल्डर म्हणाले, मुंबई बिल्डरच्या घशात टाकलीय”.
आज एक बिल्डर म्हणाले, मुंबई बिल्डरच्या घशात टाकलीय…!?
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) April 2, 2022
सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंग्यांवर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा सुजात आंबेडकर यांनी खरपूस समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली :
राज ठाकरेंवर निशाणा साधताना अजित पवार म्हणतात, राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात. त्यांना नकला आणि टीका करण्याशिवाय काहीच येत नाही. त्यांनी एकदा परीक्षण करावं की त्यांचे आमदार त्यांना सोडून का गेले. नुसती भाषणं करुन लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. तसेच केंद्र विरोधात मागे राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवरूनही त्यांनी टोलेबाजी केलीय. राज ठाकरे हे केवळ पलट्या मारतात, असेही अजित पवार म्हणाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर अक्कल दाढच काढली आहे. एवढ्याा लेट सरकार स्थापनेबाबत बोलायला कसं सुचलं? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे या भाषणाने राज्यातलं राजकारण जोरदार तापलं आहे. मात्र या सगळ्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार पलटवारही केला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Raj Thackeray targeted by shivsena leader Shilpa Bodkhe check here 03 April 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं