काँग्रेसमधून हकालपट्टी आणि राजस्थान भाजप भाव देईना, अखेर बुडत्याला काठीचा आधार, राजेंद्र गुढा यांचा शिंदे गटात प्रवेश

Rajendra Gudha Joined Shinde Camp | राजस्थानमधील कुचकामी आणि विवादित मंत्री राजेंद्र गुढा यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. सीएम शिंदे आज गुढा येथे पोहोचले. राजेंद्र गुढा यांच्या मुलाचा आज वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे यांना या निमित्ताने निमंत्रित करण्यात आले होते.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात गुढा यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिंदे म्हणाले की, गुढा यांची राजस्थान काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. याचे उत्तर जनता देईल. तुम्ही गुन्ह्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. कोणतीही चूक केली नाही. बाळासाहेबांच्या विचारांसाठी तुम्ही महिलांसाठी आवाज उठवला आहे असं शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री गेहलोत यांनी गुढा यांची हकालपट्टी केली होती
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्याच सरकारवर टीका केल्यामुळे राजेंद्र गुढा यांना मंत्रिपदावरून काढून टाकले होते. वास्तविक त्यांना कुचकामी असल्याने मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार होते याची चुणूक लागताच त्यांनी गेहलोत सरकारवर आरोप केले होते.
भाजपमध्ये प्रवेश मिळण्याच्या आशेने राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत म्हटले होते की, राजस्थानमधील मणिपूरसारखी परिस्थिती आहे. त्यानंतर गुढा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. गुढा यांनी गेहलोत सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. गुढा यांनी लाल डायरीचा संदर्भ देत सरकारवर निशाणा साधला होता. लाल डायरीचा मुद्दा उपस्थित करून भाजप सातत्याने गेहलोत सरकारवर हल्ला बोल करत आहे.
मात्र राजेंद्र गुढा यांची राजस्थानच्या राजकारणात कोणतीही छाप नाही आणि त्यांचा पक्षाला काहीच फायदा नसल्याने भाजपने देखील त्यांना प्रवेश नाकारला. अखेर राजकीय जीवन टांगणीला लागल्याने त्यांनी भाजप मार्फत शिंदे गटात प्रवेश मिळवल्याचं वृत्त आहे. पण त्यांच्यापाठीमागे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज नसल्याने याचा शिंदे गटाला काहीच फायदा नसल्याचं वृत्त आहे. तसेच इकडे महाराष्ट्रात २०२४ नंतर शिंदे गटाला काही भविष्यकाळ आहे का हा प्रश्न असताना तिकडे राजस्थानमध्ये पक्ष विस्तार म्हणजे राजकीय विनोद आहे एवढंच या क्षणाला बोलू शकतो.
News Title : Rajendra Gudha Joined Shinde Camp check details on 09 Sept 2023 Marathi news.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं